Traditional Fishing: राज्यात 1 ऑगस्टपासून मासेमारी पूर्ववत, आर्थिक उलाढालीला मिळणार गती

ट्रॉलर्स सज्ज : विविध ठिकाणच्या जेटींवर तयारीला वेग
Fishing
FishingDainik Gomantak

Traditional Fishing राज्यातील मच्छीमारी बंदीचा दोन महिन्यांचा कार्यकाळ उद्या सोमवारी संपत असून परवा मंगळवारी 1 ऑगस्टपासून मासेमारी हंगामाला पूर्ववत सुरवात होणार आहे. मासेमारी हंगामाचे स्वागत करण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणच्या जेटींवर मच्छीमार बांधवांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.

साळ नदीवरील कुटबन जेटीवर जाळी सुकवणे, ट्रॉलर सज्ज करणे आदी कामे करण्यात मच्छीमार बांधव व्यस्त असलेले आज दिसून आले.

गेले दोन दिवस पावसाने थोडी उसंत घेतल्याने बोटमालकांना मजुरांना घेऊन काही कामे हातावेगळी करणे शक्य झाले आहे. सध्या कुटबन जेटीवर उन्हामध्ये सुकण्यासाठी जाळी टाकली आहेत.

मासळी ताजी ठेवण्यासाठी बर्फाचा वापर केला जातो. त्यासाठी जेटीवर बर्फ तयार करण्याचा कारखाना कार्यरत झाला आहे.

कुटबन बोटमालक संघटनेचे माजी अध्यक्ष सिप्रियान कार्दोज यांनी मजुरांच्या कमतरतेचा प्रश्र्न उपस्थित केला. ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वच बोटी समुद्रात जातील असे दिसत नाही.

मात्र, सूर्यप्रकाशामुळे सर्व बोटमालक खुशीत आहेत. यंदा मासेमारी व्यवसायाला चांगले दिवस येतील, असे त्यांनी सांगितले.

Fishing
Siolim Gram Sabha : शिवोली ग्रामसभा बांधकाम परवान्याचा मूद्दा तापला, परप्रांतीयांच्या बांधकाम वसाहतीं प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक

मजुरांची कमतरता

ट्रॉलरमालक मासेमारी हंगामाची सुरवात करण्यास सज्ज झालेले असले तरी त्यांच्यासमोर अनेक समस्या आहेत. त्यातील एक म्हणजे स्थलांतरित मजुरांची कमतरता. मासेमारी बंदीनंतर ओडिसा व झारखंडमध्ये गेलेले मजूर अद्याप परतलेले नाहीत. काही मजूर परत आले असून उद्या, परवापर्यंत आणखी मजूर येतील, असा अंदाज आहे.

Fishing
Goa Land Grabbing Case: जमीन हडप चौकशीत 47 पैकी 2 प्रकरणे बंद

बोटमालक आपल्या बोटी समुद्रात न्यायला तयार आहेत. केवळ प्रश्र्न आहे तो मजुरांचा. मजूर अजून मोठ्याप्रमाणात आलेले नाहीत. या जेटीवर लहान - मोठ्या सुमारे 350 बोटी आहेत. त्यातील काही बोटी मंगळवारी समुद्रात मच्छीमारीसाठी जातील अशी अपेक्षा आहे.

- विनय तारी, चेअरमन, कुटबन जेटी मच्छीमार सोसायटी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com