NGOs give helping hand to those suffered damage during Goa floods Dainik Gomantak
गोवा

Goa Floods: आपत्तीग्रस्तांच्या मदतीला समाजसेवी संघटनांचा महापूर

सत्तरी तालुक्यात (Sattari) मुसळधार पावसाने (Heavy Rains) थैमान घातल्यानंतर त्याची परिणती महापुरात झाली (Goa Monsoon Floods)

दैनिक गोमन्तक

वाळपई : सत्तरी तालुक्यात (Sattari) मुसळधार पावसाने (Heavy Rains) थैमान घातल्यानंतर त्याची परिणती महापुरात झाली (Goa Monsoon Floods). त्यामुळे येथे होत्याचे नव्हते झाले. सर्वत्र चिखल, घरांची पडझड, अशी बिकट स्थिती निर्माण झाली. सध्या सत्तरी तालुक्यात पूरग्रस्त भागात अनेक समाजसेवी संघटना, संस्थांचा लोकांच्या मदतीसाठी महापूर आलेला आहे.

विविध संघटनांचे कार्यकर्ते, स्वयंसेवक पूरग्रस्तांच्या घरी जाऊन मातीत, चिखलात हात घालून सेवा देत आहेत. भारतमाता की जय, रेव्होल्युशनरी गोवन्स, सत्तरी जनसेवा प्रतिष्ठान, रोटरी क्लब गोमंतक, संत निरंकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आदी संघटनांचे स्वयंसेवक दिवस-रात्र पूरग्रस्त भागात थांबून लोकांना अन्न-पाणी, घरांची शाकारणी करणे, कोसळलेले साहित्य एकत्र करणे, घरामध्ये स्वच्छता करणे इत्यादी कामे करीत आहेत. सत्तरी जनसेवा प्रतिष्ठानने दोनशेहून अधिक लोकांची अन्नधान्याची व्यवस्था केली.

रेव्होल्युशनरी गोवन्सचे सुमारे ७० कार्यकर्ते गेले पाच दिवस अहोरात्र या भागात वावरत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाणीपुरवठा करण्यासाठीही कंबर कसली. त्यांना चालक मिळत नव्हता तेव्हा त्यांचे कार्यकर्तेच पाण्याचा टँकर चालवत या भागात फिरले.

भारतमाता की जय संघटनेचे शेकडो स्वयंसेवक जीव स्वच्छतेचे काम करीत आहेत. कणकिरे, पाडेली, खडकी, अडवई, नाणूस व कुडशे या गावांत ३७ कुटुंबांना शिधावाटप, इमर्जन्सी टॉर्च, कपडे आदी वस्तू वितरित करण्यात आल्या. कार्यकर्त्यांच्याच बळावर निधीसंकलन करून पीडितांसाठी आवश्यक वस्तू खरेदी करण्यात येत आहेत. डिचोली येथील संत गाडगेबाबा छत्रछाया वृद्धाश्रमातून गेले चार दिवस रोज ६० फूड पॅकेट्सचा पुरवठा करण्यात आला. नाणूस येथील गोशाळेतील पडलेल्या छताचे काम, घरांचे तुटलेले वासे, कौले काढणे, मातीचे ढिगारे बाजूला करणे, घरात साचलेला चिखल काढणे अशा स्वरूपाचे मदतकार्य ‘भारतमाता की जय’च्या कार्यकर्त्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

SCROLL FOR NEXT