काणकोण : रस्त्यावरील गोधनाच्या (Slaughter of cows) हत्येला जबाबदार कोण? हा प्रश्न गेली अनेक वर्षे अनुत्तरीत आहे. मात्र, गेल्या आठवडाभरात मडगाव -कारवार (Margao) हमस्त्याच्या गुळे ते माशे पर्यंतच्या टापूत वाहनांच्या धडकेने सुमारे पंधरा गुरांचा बळी गेला. तसेच भटक्या गुरांमुळे चाररस्ता ते माशे पर्यंतच्या बगलमार्गावर चार अपघात घडले. सुदैवाने कोणत्याच अपघातात मनुष्यहानी झाली नाही. (Who is responsible for Slaughter of cows in Goa)
शेतीचे यांत्रिकीकरण झाले आणि गोधनावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. त्यामुळेच भटक्या व बेवारस गुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एका अंदाजाप्रमाणे पोळे ते गुळे व अंतर्गत भागात दोन हजारांपेक्षा जास्त भटकी गुरे आहेत. त्याच्यावर कुणाचेच नियंत्रण नाही. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुळे येथे मडगावहून कारवारच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकने रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या पंधरा गुरांना धक्का दिला. त्यापैकी अकरा गुरे जागीच ठार झाली. एका जखमी वासरावर उपचार करण्यात आले. या घटनेमुळे भटक्या गुरांच्या समस्येला कारणीभूत कोण? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
"पोळे ते गुळे पर्यंत मडगाव-कारवार महामार्गावर बेवारस गुरांचा उपद्रव पावसाळ्यात जास्त होतो. ठिकठिकाणी भटक्या गुरांचे ताफे रस्त्यावरच ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे रहदारीला त्रास होतो, रस्ते शेणाने भरल्याने निसरडे बनतात. गावडोंगरी पंचायत क्षेत्रातील फुलामळ येथे कामधेनू गोरक्षा संस्थेतर्फे पांचशे गुराची व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्या या संस्थेकडे बावीस बेवारस गुरे आहेत. त्यांचे संगोपन गेले वर्षभर संस्था करीत आहे."
- अमेय पुराणीक, कामधेनू गोरक्षा संस्थेचे पदाधिकारी
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.