Goa Monsoon 2024 
गोवा

Goa Weather Update: गोव्यात पाच दिवस 'यलो अलर्ट', वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

Yellow Alert In Goa: या काळात ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

Pramod Yadav

पणजी: गोव्यात आजपासून पाच वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गोवा हवामान खात्याच्या वेधशाळेने राज्यात 30 जुलै ते 03 ऑगस्ट या काळात 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने उसंत घेतली असताना पुन्हा एकदा मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे.

गोवा हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 30 आणि 31 जुलै आणि 01 ते 03 ऑगस्ट या काळात राज्यातील दोन्ही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या काळात 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

राज्यात धुमशान घालणाऱ्या पावसाचा काही दिवसांपासून जोर मंदावला आहे. आता काही काळ पाऊस विश्रांती घेणार असल्याची चिन्हे दिसत असताना गोवा हवामान खात्याने आजपासून पाच दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात 11.2 मि.मी. इतक्या तुरळक पावसाची नोंद झाली. आत्तापर्यंत राज्यात एकूण 2851.7 मि.मी. म्हणजेच 112 इंच पावसाची नोंद झाली आहे.

पडझडीचे सत्र सुरुच

राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी वादळी वाऱ्यामुळे विविध भागात होणाऱ्या पडझडीच्या घटना सुरुच आहेत. झाडे कोसळून मालमत्तेचे नुकसान होत असून, नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

गेल्या पंधरा दिवसात गोव्यात मुसळधार पावसामुळे अनेक दुर्घटना घडल्या यात सात जणांचा मृत्यू झाला. काही ठिकाणी घराचे छत कोसळून अपघात घडले तर काही ठिकाणी झाड कोसळल्याने काहींचा अपघाती मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT