Waterlogged houses in Thivim Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2024: गोव्यात पावसाचे थैमान सुरुच! थिवीत घरांना पाण्याचा वेढा

Goa Weather Update: रविवारपासून जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतर या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले.

गोमंतक ऑनलाईन टीम

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच आहे. म्हापसा तसेच बार्देशातील सखल भागांतील काही घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्या आहेत. पायणीवाडा-थिवी येथे गेल्या दोन दिवसांपासून आठ ते नऊ घरांना पाण्याने वेढले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, रविवारपासून जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतर या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. काही घरांमध्ये गुडघ्याइतके पाणी भरले आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेकांना रात्रभर घरात घुसलेले पाणी उपसावे लागले.

या घरांच्या पाठीमागे मानस आहे. परंतु, मानशीच्या दरवाजावर झाडेझुडपे व इतर अडथळे अडकल्याने पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा होत नसल्यानेच ही स्थिती उद्वल्याची शक्यता या स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली.

पेडणे तालुक्यातील न्हयबाग-मालपे येथील राष्ट्रीय महामार्ग ६६ वर आज मंगळवारी सकाळी दुसऱ्यांदा मोठी दरडी कोसळून महामार्ग पूर्णपणे बंद झाला. त्यामुळे वाहतूक पूर्वीच्या जुन्या मार्गाने वळविण्यात आली आहे. मालपे व न्हयबाग या दोन्ही बाजूंनी मोठ्या चढणी आहेत.

वाहनांना विशेषतः अवजड वाहनांना त्या त्रासदायक ठरतात. तसेच अंतर कमी करण्यासाठी चौपदरी महामार्गासाठी हा बगलमार्ग करण्यात आला आहे. या महामार्गाचे कंत्राट एमव्हीआर इन्फ्रा प्रोजेक्टस प्राव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहे.

सुमारे अडीच ते तीन किलोमीटर अंतराचा नवीन बगलमार्ग बांधण्यात आला. गेल्या मार्च-एप्रिलमध्ये हा रस्ता वाहतुकीसाठी खुलाही करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT