Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Rainfall: राज्यात गेल्या 24 तासांत सरासरी 60 मिमी पाऊस; रेल्‍वे, विमानसेवा कोलमडली

पावसाचा रेड नव्हे तर ऑरेंज अलर्ट

दैनिक गोमंतक

Goa Monsoon 2023: मध्य अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला वादळी कमी दाबाचा पट्टा प्रवाहित होऊन प्रभावहीन बनला आहे. त्‍यामुळे पावसाचा जोर ओसरणार आहे. मात्र, पडझडीचे सत्र सुरूच असून रेल्‍वे सेवाही विस्‍कळीत झाली आहे.

कोकण रेल्वेमार्गावरील अनेक रेल्वे रद्द करण्‍यात आल्‍या आहेत. हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.

राज्यात गेल्या 24 तासांत सरासरी 60 मिमी पावसाची नोंद झाली आहे. उत्तर गोव्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. यामुळे घरांच्या पडझडीबरोबर रस्त्यावर पाणी साचले. अनेक ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

विमान सेवेवर परिणाम

पश्चिम किनारपट्टीत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे विमान सेवाही काहीशी विस्कळीत झाली. सकाळच्या सत्रात काही विमाने उशिरा ये-जा करत होती, अशी माहिती विमान प्राधिकरणाने दिली.

पनवेल येथे मालगाडी घसरली

मध्य रेल्वेच्या पनवेल-कळंबोली मार्गावर मालगाडीचे पाच डबे घसरल्याने कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेवाहतूक विस्कळीत झाली. या अपघातात जीवितहानी झाली नाही. पावसामुळे हा मार्ग सुरळीत करण्यास विलंब लागत आहे.

त्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, काही गाड्या अंशतः रद्द केल्या आहेत तर काही गाड्यांच्या मार्गात बदल केला गेला आहे.

जनजीवन विस्‍कळीत

  • धारगळ येथे दरड कोसळल्याने काहीकाळ वाहतुकीवर परिणाम

  • माडेल-चोडण येथे फेरीबोट धक्‍क्‍यानजीक रस्‍त्‍यावर आले पाणी.

  • चिंचणी येथील जुन्या व जीर्ण इमारतीचा भाग अचानक कोसळला

  • रुमडामळ भागात घरावर दरड कोसळली, महिला थोडक्‍यात बचावली

पणजीत पर्यटकांची गर्दी

राज्यात गेल्या आठवड्याभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे. शनिवारी हवामान खात्याने राज्यात रेड अलर्ट जाहीर करूनसुद्धा रविवारी पणजीत देशी पर्यटकांची गर्दी होती. शेकडो देशी पर्यटकांनी पणजी चर्चला भेट दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND VS NZ: किवींचा धुव्वा उडवण्यासाठी 'रो-को' सज्ज! कधी आणि कुठे पाहता येईल पहिला एकदिवसीय सामना? जाणून घ्या

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

विदेशी माणसांप्रमाणेच विदेशी झाडेही आक्रमक! आपली जैवविविधता वाचवण्यासाठी 'देशी' वृक्षांची गरज

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

SCROLL FOR NEXT