Goa Charter Flights: ऑक्टोबरमध्ये गोव्यात येणार 25 चार्टर फ्लाईट्स; रशिया, कझाकिस्तान, इस्रायलचे पर्यटक येणार

मॉस्को-दिल्ली थेट विमानसेवाही सुरू होणार
Goa Tourism Charter Flights in October:
Goa Tourism Charter Flights in October:Dainik Gomantak

Goa Tourism Charter Flights in October: गोव्यातील पर्यटन हंगामाला 1 ऑक्टोबर रोजी सुरवात झाली आहे. या वर्षीच्या पर्यटन हंगामातील पहिले चार्टर विमान रविवारी, 1 ऑक्टोबर रोजी दाबोळी विमानतळावर दाखल झाले. रशियाची राजधानी मॉस्को येथून ही चार्टर फ्लाईट आली असून यातून 300 पर्यटक गोव्यात आले आहेत.

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात परदेशी पर्यटकांना घेऊन एकूण 25 चार्टर विमाने येऊ शकतात. चार्टर फ्लाईट ऑपरेटर्सकडे ही 25 विमाने बूक केली गेली आहेत. तथापि, चार्टर विमानांच्या संख्येत किरकोळ बदल होऊ शकतो.

Goa Tourism Charter Flights in October:
Konkan Railway Trains: मांडवी, कोकणकन्या एक्सप्रेस रद्द; काही रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल...

अद्याप स्लॉट अंतिम केले गेलेले नाहीत. त्यामुळे चार्टर विमानांची संख्या वाढू शकते किंवा कमी होऊ शकते.

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) च्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यासाठी 25 चार्टर स्लॉट बूक केले गेले आहेत. त्यातून रशिया, कझाकिस्तान आणि इस्रायलमधून पर्यटक गोव्यात येतील. एअर अस्ताना अल्माटी कझाकस्तान येथून चार्टर चालवतील.

अर्किया एअरलाइन्स तेल अवीव इस्रायलमधून आणि एरोफ्लॉट रशियातून काम करेल.

Goa Tourism Charter Flights in October:
Goa Rain: चोडण फेरी धक्का पाण्याखाली; वाहनधारकांची उडाली तारांबळ...

रशियन एरोफ्लॉटने निवेदनात म्हटले आहे की, भारत आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय कराराचा भाग म्हणून गोव्याशिवाय मॉस्को ते दिल्ली थेट उड्डाणेदेखील सुरू करण्यात येतील. शेरेमेत्येवो विमानतळावरून मंगळवार, शुक्रवार आणि शनिवारी अशी तीन साप्ताहिक उड्डाणे चालविली जातील.

दरम्यान, UK मधून चार्टर उड्डाणे नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com