Prabhunagar Ponda Dainik Gomantak
गोवा

Ponda: फोंड्यात भिंत कोसळून कार आणि दुचाकींचे नुकसान; गॅस पाईपलाईनही तुटली

गोवा हवामान खात्याने राज्यात पुढील 3 ते 4 तासांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

Pramod Yadav

Goa monsoon 2023: गोव्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर मागील काही दिवस पावासाने उसंत घेतली आहे. तरी आधूनमधून जोराचा पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड होत आहे.

प्रभुनगर फोंडा येथून संरक्षक भिंत कोसळण्याची एक घटना समोर आली आहे. यात भिंतीखाली पार्क केलेल्या चारचाकीचे आणि शेजारीच असलेल्या दुचाकींचे नुकसान झाले आहे. आज (शुक्रवारी, दि.14) सकाळी साडे दहा वाजता ही घटना घडली.

Prabhunagar Ponda

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडे दहा वाजता प्रभुनगर येथील एका घराची संरक्षक भिंत कोसळली. त्यात खालीच पार्क केलेल्या चारचाकीवर भिंतीचा सर्व भराव पडल्याने त्याचे मोठे नुकसान झाले तर, त्या शेजारीच असलेल्या दुचाकींचे देखील नुकसान झाले आहे. येथून जाणारी गॅस पाईपलाईन तुटल्याने पाईप लिक झाली, दरम्यान, पाईपलाईन तात्काळ दुरूस्त करण्यात आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहाणी झाली नाही.

सैन्य दलाचे कुंपण रस्त्यावर कोसळले

कुर्टी पंचायत कार्यालय जवळील सौन्य दलाचे कुंपण रसत्यावर कोसळले आहे. गुरूवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. भिंत पडल्यानंतर मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू आहे.

याशिवाय सततच्या पावासामुळे कारापूर-विठ्ठलापूर येथील फणसाचे झाड रस्त्यावर कोसळले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून झाड हटविण्याचे काम सुरू आहे.

तसेच, कांपाल पणजी जिमखाना जवळ मोठे झाड कोसळल्याने दोन दुचाकींचे नुकसान झाले आहे.

राज्यात पुढील 3 ते 4 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

गोवा हवामान खात्याने राज्यात पुढील 3 ते 4 तासांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान खात्याने राज्यातील जनतेला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damodar Saptah: जय जय रामकृष्ण हरी! दामोदर भजनी सप्ताह; 24 तास साखळी पद्धतीने भजनाची परंपरा

Goa Road Safety: '20 कोटी' दंड वसूल, मग अपघातप्रवण क्षेत्रे का सुधारली नाहीत? आलेमाव यांचा विधानसभेत सवाल

Goa Government Homes: दिलासा! गोव्यात बेघर लोकांना मिळणार हक्काचे घर; CM सावंतांची घोषणा

Goa Government Jobs: गोव्यातील सरकारी खात्‍यांत 2618 पदे रिक्त; वीज, वन, सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये सर्वाधिक पदे

Rashi Bhavishya 29 July 2025: भावनिक अस्थिरता जाणवेल, आर्थिक बाबतीत नवीन संधी येतील; नव्या जबाबदाऱ्यांचं स्वागत करा

SCROLL FOR NEXT