Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: ऑक्टोबरमध्ये आत्तापर्यंत 57 टक्के जास्त पाऊस; मॉन्सून पॅटर्न बदलतोय...

गोव्यातून अद्याप मॉन्सूनची माघार नाही

Akshay Nirmale

Goa Monsoon 2023: भारतातून मॉन्सूनने माघारीचा प्रवास सुरू केला आहे. तथापि, गोव्यातून अद्याप मॉन्सूनने पूर्ण माघार घेतलेली नाही. ऑक्टोबर महिन्याचा विचार करता पहिल्या आठवड्यात गोव्यात सर्वसामान्य प्रमाणापेक्षा 57 टक्के जास्त पाऊस झाला आहे.

गोव्यात सामान्यतः जून ते सप्टेंबर हा पावसाचा काळ आहे. आणि ऑक्टोबरच्या सुरवातीला गोव्यातून मॉन्सूनच्या पावसाची माघार होत असते. तथापि, यंदाच्या मॉन्सूनच्या हंगामात बरेच बदल दिसून आले आहेत.

देशातील अनेक राज्यांतून मॉन्सूनने माघार घेतलेली आहे. तथापि, गोव्यातून मात्र अद्याप माघार घेतलेली नाही.

हवामानतज्ज्ञांच्या मते, गोव्यात एरवी ऑक्टोबर महिन्यात दहा दिवसांमध्ये सरासरी 143 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तथापि, यावेळी हवामान बदल दिसून येत आहे.

त्याचा परिणाम गोव्याच्या एकूण हवामानात दिसून येत आहे. त्यामुळे गोव्यातील मॉन्सूनचा पॅटर्न बदलताना दिसत आहे.

सध्या राज्यात स्वच्छ आकाश आणि घटलेली आर्द्रता तसेच वाढते तापमान अशी स्थिती राज्यात अनेक ठिकाणी आहे.

सध्या मध्य भारत, देशाचा बराचसा भाग आणि उत्तर महाराष्ट्रातून मॉन्सूनने पूर्णतःमाघार घेतली आहे. तर, आगामी काही दिवसांत गोव्यातूनही मॉन्सून पूर्ण माघार घेईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT