Goa PWD: गोव्यात अद्यापही 80 ते 100 एमएलडी शुद्ध पाण्याची कमतरता; पुढील वर्षात राज्य होणार स्वयंपूर्ण

राज्यात 300 MLD क्षमतेचे प्रकल्प होणार कार्यान्वित
Goa PWD
Goa PWDDainik Gomantak
Published on
Updated on

Goa PWD: गोव्यात सध्या दररोज 672 MLD इतके प्रक्रियायुक्त पाणी तयार केले जाते. तरीही हे प्रमाण गोव्याच्या गरजेपेक्षा आवश्यकतेपेक्षा 80 ते 100 MLD कमी आहे. गोव्यात नॉन-रेव्हेन्यू वॉटर (NRW) चे प्रमाण जास्त आहे.

कारण जुन्या पाइपलाइनमधून गळती झाल्यामुळे 30 टक्क्यापेक्षा जास्त पाणी वाया जाते. तथापि, आगामी वर्षात म्हणजे 2024 मध्ये गोवा पाण्याच्या गरजांमध्ये स्वयंपूर्ण होईल.

कारण एकूण 300 MLD क्षमतेचे वेगवेगळे प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी तयार होतील अशी माहिती, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) मुख्य अभियंता संतोष म्हापणे यांनी दिली आहे.

दोना पावला येथील इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनतर्फे झालेल्या चर्चासत्रात ही माहिती त्यांनी दिली. या परिसंवादात 'शाश्वत आणि निरंतर पाणी सेवा' या विषयावर चर्चा झाली.

Goa PWD
Goa Climate Disasters Exercise: गोव्यात हवामानविषयक आपत्तींबाबत 9 ऑक्टोबरपासून सराव; 8 देशांचा सहभाग

ते म्हणाले की, गोव्यात पुरेशा पाण्याची उपलब्धता आहे. दक्षिण गोवा आधीच प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. आम्ही उत्तर गोव्यात मागे आहोत. आम्ही जुन्या पाईपलाईन टप्प्याटप्प्याने बदलण्याचे काम हाती घेतले आहे.

एकूण 300 MLD च्या पायाभूत सुविधांची कामे ट्रीटमेंट प्लांट सुरू आहेत. त्यामुळे 2024 पर्यंत गोवा स्वच्छ पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल.

चांदेल प्लांटची क्षमता 15MLD वरून 30MLD पर्यंत दुप्पट करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. गांजे येथील 25 MLD प्लांटचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आम्ही पिळर्ण येथील 15 MLD प्लांटसाठी निविदा काढल्या आहेत.

तिथून कळंगुट आणि साळगाव मतदारसंघातील पाण्याची गरज भागेल. हा प्रेशर फिल्टर प्लांट असल्याने त्याचे काम लवकरच पूर्ण होईल.

Goa PWD
Amol Satoskar: हिमालयातील कठिण मोटर रेसमध्ये गोमंतकीयाचा झेंडा; अमोल सातोस्करने जिंकली शर्यत...

2024 पर्यंत तुये येथे आणखी 30 MLD जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण होईल. या प्रकल्पात पाणी आणण्यासाठी जलसंपदा विभागाचे (WRD) काम सध्या सुरू आहे. मोर्ले आणि दुभाशे यांना 120 MLD प्रेशर फिल्टर प्लांट देखील मिळतील.

PWD अभियंता पौर्णिमा मावझो यांनी सांगितले की गोव्यासाठी, इंटरनेट ऑफ थिंग्ज आधारित पाणी गुणवत्ता व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीचा विचार केला जात आहे.

त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या डेटामधील मानवी त्रुटी दूर होईल आणि कमी खर्चात रिअल-टाइम डेटा उपलब्ध होईल. हे आम्हाला डेटाचे विश्लेषण करण्यास आणि त्यानुसार सिस्टममधील सुधारणांचा विचार करण्यास साह्यकारी ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com