Goa: Missing teen girl found dead on Calangute beach; probe on 
गोवा

Goa: काय आहे 'तिच्या' मृत्यू मागचे गूढ?

या घटनेमुळे 2008 साली हणजूण किनाऱ्यावर अशाच प्रकारे मृतावस्थेत सापडलेल्या स्कार्लेट किलींग प्रकरणाच्या कटू स्मृती जाग्या झाल्या.

Priyanka Deshmukh

शिवोली : गोवा (Goa) राज्यातील बाणावली येथील बलात्कार प्रकरण ताजे असतानाच नास्नोळा-हळदोणे येथील बुधवारपासून बेपत्ता असलेल्या 19 वर्षीय तरुणीचा अर्धनग्नावस्थेतील मृतदेह काल गुरुवारी सकाळी कळंगुट समुद्रकिनारी (Calangute beach) आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शवचिकित्सा अहवालात तीचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, ही घटना घातपाताचा प्रकार असल्याचा संशय तीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी कुटूंबियांनी केली आहे. (Goa: Missing teen girl found dead on Calangute beach; probe on)

या घटनेमुळे 2008 साली हणजूण किनाऱ्यावर अशाच प्रकारे मृतावस्थेत सापडलेल्या स्कार्लेट किलींग प्रकरणाच्या कटू स्मृती जाग्या झाल्या. या युवतीवरही असाच प्रसंगी ओढवला नसेल कशावरून असा सवाल आता लोक उपस्थित करत आहेत. महिन्याभरात महिलांसंदर्भातच्या एकामागोमाग एक अशा घटना घडत असल्याने राज्यातील महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांवरून सरकारच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित झाला होता. त्यामुळे हे प्रकरण दडपण्यात आले आहे का याबाबतही संशय व चर्चा सुरू झाली आहे.

या युवतीच्या मृत्यूमागील गूढ उकलण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. कळंगुट, हणजूण व म्हापसा पोलिस स्थानकाचे पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत. तिच्या अंगावरील कपडे कोठे गेले याचा तपास केला जात आहे. काही दिवसांपासून ती मानसिक तणावाखाली होती, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

तीचा मृत्यू बुडून झाल्याचे शवचिकित्सा अहवालात निष्पन्न झाले असले तरी तिच्या त्यामागील कारणे पोलिसांनी शोधून काढण्यास सुरवात केली आहे. पोलिसांनी तिच्या कुटुंबियांकडून तसेच ती ज्या नामांकित मॉलमध्ये कामाला होती तेथून माहिती जमा करण्याचा प्रयत्न करत आहेत. उपनिरीक्षक प्रगती नाईक यांनी मृतदेहाचा पंचनामा केला. या प्रकरणी पुढील तपास निरीक्षक नोलास्को रापोझ करत आहेत. युवतीच्या मृतदेहावर काल गुरुवारी संध्याकाळी नास्नोळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT