Rape Case: गोव्यात महिला खरच सुरक्षित आहेत का?

जुलै महिन्यात घडलेल्या 4 बलात्काराच्या घटनेनंतर गोव्यात महिला सुरक्षित आहेत का?
गोव्यात महिला खरच सुरक्षित आहेत का?
गोव्यात महिला खरच सुरक्षित आहेत का?Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यात (Goa) महिला (Women) खरेच सुरक्षित (Secure) आहेत का? कळंगुट (Calangute) येथे एका मुलीचा संशयास्पद मृत्यूमुळे पुन्हा एकदा हा प्रश्न चर्चेत आला आहे. मागच्या सात महिन्यात गोव्यात 14 बलात्कार, 12 विनयभंग आणि 15 अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना नोंद झाल्या असून, प्रशासन मात्र ‘भिवपाची गरज ना’ असाच दिलासा देत सुस्त बसले आहे. (Rape Case: Are women really safe in Goa)

25 जुलै रोजी बाणावली येथे दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना उघड झाल्यावर संपूर्ण राज्य हादरून गेले होते. हा प्रश्न विधानसभेत चर्चेस आला त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पालकांनीही आपल्या मुलांकडे थोडे लक्ष द्यायला पाहिजे असे म्हटले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी फोंडा येथील एका विद्यार्थीनीचा तिच्या शिक्षकानेच विनयभंग केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शिक्षकांच्या हातातही मुले सुरक्षित नाहीत हे सिद्ध झाले आहे.

गोव्यात महिला खरच सुरक्षित आहेत का?
Goa Rape Case: आसामी युवतीवर बलात्कार प्रकरणी 21 ऑगस्टला सुनावणी

त्याहीपूर्वी म्हणजे जून महिन्यात एका युवतीने मुरगाव पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून काम करणाऱ्या रुषाल पिंगे याच्याविरुद्ध आपल्यावर बलात्कार आणि फसवणूक केल्याची तक्रार केली होती तर बाणावली सामूहिक बलात्कार प्रकरणातील एक संशयित सरकारी कार्यालयातील चालक असल्याचे दिसून आले होते. यामुळे या राज्यात सरकारी नोकरांवरही पोलिसांचा वचक नसल्याचे स्पष्ट होत आहे.

एप्रिल महिन्यापासून गोव्यातील या लैंगिक अत्याचाराच्या घटना पुढे येत असून, 15 एप्रिल रोजी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीजवळ एका नवजात बालकाची हत्या केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली असता त्यातील एका आरोपीने त्यापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. त्यातूनच त्या मुलीला बाळ झाले. त्याच बाळाची त्या आरोपींनी हत्या केली. ही घटना ताजी असतानाच 17 एप्रिलला आणखी एक धक्कादायक वृत्त येऊन थडकले. उत्तर गोव्यात चालवीत असलेल्या एका बालिका आश्रमातील मुलींवर आश्रमचालकानेच लैगिंक अत्याचार केले.

गोव्यात महिला खरच सुरक्षित आहेत का?
गोव्याच्या कळंगुट किनाऱ्यावर तरुणीचा मृतदेह नग्नावस्थेत आढळल्याने खळबळ

मागच्या जुलै महिन्यात तर कहरच झाला असे म्हणावे लागेल. सगळीकडे बाणावली येथे दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना वणव्यासारखी राज्यभर पसरली असतानाच केपे येथे आसामी युवतीला नोकरीचे आमिष दाखवून आणून दोघांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले. तर कुर्टी फोंडा येथे एका युवतीशी ओळख वाढवून नंतर तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली दोन केरळी ट्रक चालकांना अटक करण्यात आली. या साऱ्या घटनांमुळे गोव्यात महिला सुरक्षित नसल्याचे प्रखरपणे पुढे आले.

आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर घटना उजेडात

जून महिन्यात असेच आणखी एक प्रकरण उजेडात आले. डिचोली येथील एका अल्पवयीन मुलीवर कित्येक जणांनी लैगिंक अत्याचार केल्याच्या वृत्ताचे पडसाद सगळीकडे उमटले.जुलै महिन्यात मडगाव येथे काम करणाऱ्या रहीम खान याने एका १७ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर कित्येकवेळा बलात्कार केला. शेवटी त्या युवतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर ही गोष्ट उजेडात आली.

"ध्या गोव्यात महिलांवरील वाढते अत्याचार हा गंभीर विषय बनला असून आता पोलिसांनी अधिक सतर्कता दाखविणे गरजेचे आहे. कुठलीही लहान स्वरूपाची तक्रार जरी कुणी पोलीस स्थानकात घेऊन आला तरी त्याची गंभीरतेने चौकशी करण्याची गरज आहे. जेणेकरून महिलांमध्ये विश्वास वाढू शकेल."

- आवदा व्हिएगस, महिला हक्क चळवळीतील नेत्या

गोव्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराची प्रकरणे पाहिल्यास राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळून गेली आहे हे सिद्ध होत असल्याचे महिला काँग्रेसच्या गोवा अध्यक्ष बीना नाईक यांनी म्हटले आहे. याच्या निषेधार्थ आज काही महिलांसह त्या दुपारी पणजीच्या आझाद मैदानावर धरणे धरणार आहेत.

जुलै महिन्यातील बलात्काराच्या घटना

• कोलवा : दोघा तरुणींवर पोलिस असल्याचे भासवून बलात्कार

• पेडणे : उसगाव येथील दोघा ट्रक चालकांकडून तरुणीवर अत्याचार

• केपे : घरकामासाठी गोव्यात आणलेल्या आसामी तरुणीचे दोघांकडून बलात्कार

• होंडा-वाळपई : अल्पवयीन युवतीवर बलात्कार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com