Goa Rape Case
Goa Rape CaseDainik Gomantak

Goa Rape Case: आसामी युवतीवर बलात्कार प्रकरणी 21 ऑगस्टला सुनावणी

युवतीला दारू पाजून त्या व्यावसायिकडे शरीरसंबंध ठेवण्याची बळजबरी केली.

सासष्टी: नोकरी देण्याचे आमिष दाखवून गोव्यात (Goa) आणलेल्या 20 वर्षीय आसामी (Assam) युवतीवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी केपे पोलिसांनी (Police) अटक केलेल्या संशयित शंभूनाथ सिंग आणि सुधाकर नाईक यांनी सत्र न्यायालयात (Court) दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज युक्तिवाद झाले असून पुढील सुनावणी 21 ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. सुधाकर यांच्या बाजूने ॲड. शौमिक पै आंगले बाजू मांडत आहेत, तर शंभूनाथ यांच्या बाजूने ॲड. एस. नास्नोडकर बाजू मांडत आहेत. (Hearing of Assam girl raped case August 21 in goa court)

Goa Rape Case
Goa Rape Case: पीडितेच्या पालकांना दोष नकाे

संशयित शंभूनाथ यांनी 26 जुलै रोजी पीडित मुलीला केपे येथे आणले होते. त्याच्या बहिणीची सदनिका केपेतील ‘इडन गार्डन’ इमारतीत आहे. तिथेच त्याने तरुणीची राहण्याची व्यवस्था केली होती. तरुणीच्या तक्रारीनुसार, त्या सदनिकेवर प्रथम शंभूनाथ याने तिच्यावर बलात्कार केला. नंतर 28 जुलै रोजी कुडचडे येथील दुकान चालवणाऱ्या सुधाकर नाईक याने बलात्कार केल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. त्याने त्या युवतीला दारू पाजून त्या व्यावसायिकडे शरीरसंबंध ठेवण्याची बळजबरी केली.

Goa Rape Case
आसामी युवतीवर गोव्यात बलात्कार

या तरुणीने घडलेला प्रकार स्वतः व्हिडीओ रेकॉर्डिंग करून नंतर पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर प्रकरण उजेडात आले. पोलिसांनी बुधवारी रात्रीच गुन्हा दाखल करून दोन्ही संशयितांना अटक केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com