digambar kamat latest news Dainik Gomantak
गोवा

"हांव खरें तेंच उलायला", एका शब्दाने उडाला गोंधळ; तरीही मंत्री कामत शब्दावर 'ठाम'

minister digambar kamat statement: व्हिडिओ व्हायरल झाल्याने गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले नवनिर्वाचित मंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी अखेर या प्रकरणावर मौन सोडले

Akshata Chhatre

पणजी: "१५ साल भाजप गोवा में आ नही सकती" (भाजप १५ वर्षे गोव्यात येऊ शकत नाही) असं म्हणणारा व्हिडिओ व्हायरल झाल्याने गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले नवनिर्वाचित मंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी अखेर या प्रकरणावर मौन सोडले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अन्य भाजप पदाधिकाऱ्यांसमोर केलेल्या या विधानामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता स्वतः कामत यांनी माध्यमांसमोर येऊन यावर स्पष्टीकरण दिले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना कामत म्हणाले की, "मी जे खरं तेच बोललो आहे. माझ्या म्हणण्याचा माध्यमांनी चुकीचा अर्थ काढला." त्यांनी स्पष्ट केले की, ते म्हणाले होते की "१५ साल भाजप गोवा में हार नही सकती" (भाजप १५ वर्षे गोव्यात हरू शकत नाही). मात्र, त्यांचा हा हिंदीतील शब्द 'आ नही सकती' (येऊ शकत नाही) असा ऐकल्यामुळे गैरसमज झाला.

आपल्या वक्तव्याचा उद्देश स्पष्ट करताना कामत म्हणाले की, भाजपची पुढील १५ वर्षे सत्ता जाणार नाही, आणि दामू नाईक यांनी गोव्यात तसे वातावरण निर्माण करावे, असेच त्यांना म्हणायचे होते. मात्र, त्यांच्या या विधानाचा विपर्यास झाल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. विरोधकांनीही या संधीचा फायदा घेत भाजप आणि मंत्री कामत यांच्यावर जोरदार टीका केली. कामत यांच्या या स्पष्टीकरणामुळे या प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricketer Threat: 5 कोटी दे...टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला अंडरवर्ल्डकडून धमक्या, दाऊद टोळीचं नाव समोर

Opinion: मायक्रोसॉफ्ट नाही, 'झोहो शो'! केंद्रीय मंत्र्यांनी दिला स्वदेशी सॉफ्टवेअरला 'प्राइम टाइम' बूस्ट

Goa Politics: बाहेरच्या लोकांमुळे 'सुशेगाद' गोव्याची शांतता भंग! गोमंतकीयांना RG-गोवा फॉरवर्डच्या युतीत दिसतोय 'आशेचा किरण'

Viral Video: सीटवरुन 'महाभारत'! बसमध्ये दोन महिलांची तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'बायकांनी नवऱ्याचा राग...'

Senior T20 Cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT