Mulgao mining Dainik Gomantak
गोवा

Mulgao mining: "खाणीवर रात्रपाळी बंद करा, अन्यथा खाण सुरू करू देणार नाही!" मुळगावात ग्रामस्थांचा एल्गार

Mulgao mining protest Goa: जोपर्यंत बफर झोन निश्चित करून रात्रपाळी बंद करत नाही. तोपर्यंत मायनिंग सुरू करायला देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा खनिज खाण विरोधात एकवटलेल्या मुळगावच्या लोकांनी दिला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: जोपर्यंत बफर झोन निश्चित करून रात्रपाळी बंद करत नाही. तोपर्यंत मायनिंग सुरू करायला देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा खनिज खाण विरोधात एकवटलेल्या मुळगावच्या लोकांनी दिला आहे. मुळगावच्या ''खनिज'' प्रश्नी निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या उपस्थितीत आणि उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आज (बुधवारी) सायंकाळी डिचोलीत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली.

खनिज विषयावरून ही बैठक तापली, मात्र शेवटपर्यंत या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. उपजिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीवेळी ''वेदांता''चे अधिकारी, पोलिस आणि अन्य संबंधित सरकारी खात्यांचे अधिकारी तसेच मुळगाव पंचायत मंडळासह विविध कोमुनिदाद, देवस्थान, शेतकरी आदी ग्रामसंस्थांचे प्रतिनिधी मिळून मुळगावचे शंभरहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. महिलांची संख्या लक्षणीय होती. गेल्या जवळपास दोन वर्षांपासून मुळगावात खाण प्रश्न तापला आहे.

या बैठकीत माजी सरपंच वसंत गाड, कोमुनिदादचे अध्यक्ष महेश्वर परब, शेतकरी संघटनेचे प्रकाश परब, वासुदेव राऊत आदी ग्रामस्थांनी खाणीमुळे निर्माण झालेल्या समस्या बैठकीत पुढे केल्या. खाण कंपनीने गावची सुरक्षितता आणि लोकांचा विचार करावा. अशी सूचना आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी करून आपण लोकांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले.

उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांनी बैठकीपूर्वी दुपारी मुळगाव येथील खाणीवर जाऊन खाण व्यवसायाचा आढावा घेतला होता.

गावच्या अस्तित्वासाठी मुळगावच्या लोकांनी केलेल्या मागण्या रास्त आहेत. मीसुद्धा जनतेच्या पाठीशी आहे, असेही शेट्ये म्हणाले.

वेदांताकडून स्पष्टीकरण

मुळगाव येथील खाण कायद्यानुसार आणि गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार चालत आहे. मुळगाव गावासह जनतेची कंपनीला काळजी आहे. गावच्या हिताचा सकारात्मक विचार करुनच खाण व्यवसाय सुरू आहेत. खाण व्यवसायामुळे मुळगावच्या जनतेला त्रास होणार नाही. त्यादृष्टीने कंपनी उपाययोजना करीत आहे.

आंदोलने करून खाण बंद केली म्हणून गावचे प्रश्न सुटणार नाही. उलट राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची भीती आहे. गावच्या हितासाठी सकारात्मक चर्चा व्हावला हवी. आणि त्यासाठी कंपनी व्यवस्थापन चर्चेला तयार आहे. गावच्या हितासाठी मुळगावच्या जनतेकडून सहकार्य अपेक्षित आहे. असे ''वेदांता''चे उपमुख्य अधिकारी धीरजकुमार जगदीश यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Imran Khan: 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोड! इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस, सीजेपी आंदोलनात सहभागी होणं पडलं महागात

State Library Policy: वाचनालय धोरणाचे भिजत घोंगडे कायम! ग्रामीण ग्रंथपालांचे वेतन आणि डिजिटल वाचनालयाचा प्रश्न प्रलंबित

IDC Exit Support Scheme: गोव्यात बंद उद्योगांना मिळणार 'नवसंजीवनी'! आयडीसीच्या योजनेला मुदतवाढ; 1,969 रोजगारांची अपेक्षा

Barge Sale Tender: 4 कोटींच्या बार्ज-ड्रेजर विक्रीसाठी पुन्हा निविदा; गोव्यात फेरीमार्गांवरील गाळ उपशाचा प्रश्न कायम

Shai Hope 5 Major Records: शे होप ठरला रेकॉर्डब्रेकर! धमाकेदार शतकासह नावावर केले 5 मोठे रेकॉर्ड; ख्रिस गेलला मागे टाकत रचला इतिहास

SCROLL FOR NEXT