Goa Taxi Issue Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: 'आमच्या पोटावर पाय दिला जातोय'! काणकोणात टॅक्सी व्यावसायिक एकवटले; ‘गोवा माईल्स’विरोधात नगराध्यक्षांना निवेदन

Goa Miles: टॅक्सी व्यावसायिक एकवटून नगराध्यक्षा सारा नाईक देसाई यांची भेट घेऊन गोवा माईल्सच्या टॅक्सींना पालिका क्षेत्रात प्रतिबंध करावा अशी मागणी केली.

Sameer Panditrao

काणकोण: गोवा माईल्सला टॅक्सी व्यावसायिकांनी स्थानिक टॅक्सी व्यावसायिकाचा धंदा बुडविला आहे. या विरोधात शुक्रवारी येथील टॅक्सी व्यावसायिक एकवटून नगराध्यक्षा सारा नाईक देसाई यांची भेट घेऊन गोवा माईल्सच्या टॅक्सींना पालिका क्षेत्रात प्रतिबंध करावा अशी मागणी केली.

यासंदर्भात एक निवेदनही नगराध्यक्षांना सादर करण्यात आले. या निवेदनाच्या प्रती काणकोण पोलिस व वाहतूक पोलिसांनाही दिल्या आहेत. पालिका क्षेत्रात पाळोळे, पाटणे, चार रस्ता व अन्य ठिकाणी गोवा माईल्सच्या गाड्या पार्क करण्यास प्रतिबंध करावा अशी मागणी या निवेदनातून केली आहे.

याबाबत टॅक्सी चालकांनी सांगितले की, पर्यटन हंगामात सहा ते सात महिने असतो, त्यातील मिळकतीतून कुटुंबाचे पालनपोषण, गाडीचे हफ्ते, विमा हे सर्व चुकते करावे लागते. मात्र गोवा माईल्स गाड्यांमुळे आमच्या पोटावर पाय पडत आहे.

रिक्षा चालकांची भाडेही ते पळवितात त्यामुळे रिक्षा चालकांचा व्यवसायही डबघाईस आला असल्याची कैफियत काही रिक्षा चालकांनी यावेळी मांडली. काणकोणच्या टॅक्सी अडविण्याचा इशारा माईल्स वाल्यांनी दिला आहे, यासंदर्भात मंत्री रमेश तवडकर व पोलिसांना निवेदन दिल्याचे टॅक्सी चालकांनी यावेळी सांगितले.

यावेळी नगरसेवक शुभम कोमरपंत व कॉग्रेसचे जनार्दन भंडारी उपस्थित होते. नगरसेवक शुभम कोमरपंत यांनी यासंदर्भात पालिकेची खास बैठक बोलावण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. जनार्दन भंडारी यांनी टॅक्सी चालकांना आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: परतीच्या पावसाचा कहर! सत्तरीत वादळी वाऱ्यासह जबर तडाखा, वाळपईत ढगफुटी; Watch Video

Narkasur in Goa: "माझा मृत्यू..." नरकासुराने केली होती अनोखी मागणी, अजूनही गोव्यात का चालते दहनाची परंपरा?

Rama Kankonkar Assault: जोपर्यंत खऱ्या सूत्रधाराला अटक होत नाही, तोपर्यंत पोलिसांवर विश्वास नाही - रामा काणकोणकर

कसोटी सामन्यात 'Love Story'चा ट्विस्ट, दिल्लीची 'ती' सुंदर मुलगी शुभमन गिलच्या प्रेमात; 'I Love You Shubman' पोस्टर झाले व्हायरल

Crime News: धक्कादायक! वर्गमित्राने जेवणाच्या बहाण्याने बाहेर नेलं, मग आणखी दोघे आले अन्... MBBSच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT