Taxi Driver Assault: गोवा माईल्‍सच्‍या चालकाला मारहाण! टॅक्‍सीचालकांची दादागिरी; पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल

Palolem taxi driver assault: गुरुवारी दक्षिण गोव्‍यातील विविध भागातील टॅक्‍सी चालकांनी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांची भेट घेण्‍याचा प्रयत्‍न केला.
Palolem taxi driver assault
Palolem taxi driver assaultDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: एकाबाजूने अहमदाबाद येथील पर्यटक महिलेला दमदाटी केल्‍यामुळे गोव्‍याचे नाव संपूर्ण राष्‍ट्रीय स्‍तरावर खराब झालेले असतानाच पर्यटकांना सेवा देणाऱ्या गोवा माईल्‍सच्‍या चालकांनाही स्‍थानिक टॅक्‍सी चालकांच्‍या दादागिरीला सामोरे जावे लागते. बुधवारी पाळोळे येथे अशाचप्रकारे गोवा माईल्‍सच्‍या एका चालकाला स्‍थानिकांच्‍या मारहाणीला सामोरे जावे लागले.

गुरुवारी दक्षिण गोव्‍यातील विविध भागातील टॅक्‍सी चालकांनी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांची भेट घेण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र ते नसल्‍याने मडगावचे उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्‍याकडे त्‍यांनी आपली तक्रार दाखल केली.

Palolem taxi driver assault
"दक्षिण गोव्‍यात येण्‍याची चूक करू नका..." टॅक्‍सीवाल्‍यांनी केली दमदाटी, अहमदाबाद येथील महिलेनं व्‍हिडिओद्वारे व्‍हायरल केली व्यथा Watch Video

मागच्‍या सात दिवसांत हे प्रकार वाढले आहेत. बाणावली, वार्का, कळंगूट, बागा आणि पाळोळे या ठिकाणी गोवा माईल्‍सच्‍या टॅक्‍सी चालकांना अशा दादागिरीला तोंड द्यावे लागले आहे, असे या तक्रारीत म्‍हटले आहे.

Palolem taxi driver assault
Goa Taxi Issue: 'विश्वास ठेवला अन् सरकारनं फसवलं'; टॅक्सी व्यावसायिकांची मंत्रालयाबाहेर गर्दी, सीएमनी दिला Busy असल्याचा मेसेज

पाळोळे येथील घटना

काही ठिकाणी स्‍थानिकांचा गट येऊन गोवा माईल्‍सच्‍या टॅक्‍सी ड्रायव्‍हरना धमकावू लागले आहेत. तुमचे टॅक्‍सी मीटर दाखवा, बॅच दाखवा असे सांगून आम्‍हाला धमकावले जाते. काहीवेळा पोलिसही आम्‍हाला हाकलून लावतात. त्‍यामुळे या सर्व बाबींवर लक्ष घालावे, असे या निवेदनात म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com