पेडणे: राष्ट्रीय महामार्गावर (National highway) पडलेल्या भल्यामोठ्या खड्ड्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पेडणे मगो पक्षातर्फे मालपे येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी विडंबनात्मक भजन सादर करुन, खड्ड्यांत कवाथे लावून तसेच उपमुख्यमंत्री (Deputy Chirf Minister) बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar) यांच्या पुतळ्याचे खड्ड्यातच दहन करून त्यांचा व सरकारचा निषेध करण्यात आला. पेडणे मतदारसंघातील महाखाजन ते पत्रादेवीपर्यंतच्या (Mahakhajn to Patradevi) राष्ट्रीय महामार्गाची अक्षरश: चाळण झाली असून वाहतूक करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. अपघात वाढले असून, अनेकांना प्राणही गमवावे लागले आहे. या खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचत असून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बाबू आजगावकर यांच्यावर विडंबनात्मक भजन सादर करून तसेच गाऱ्हाणे घालून निषेध करण्यात आला.
बाबू आजगावकर यांच्यावर विडंबनात्मक भजन सादर करून तसेच गाऱ्हाणे घालून निषेध करण्यात आला. गाऱ्हाणे पुढीलप्रमाणे : ‘‘ बाबा रस्ते महाराजा...आज सरकारकडे रस्ते दुरुस्ती करण्यासाठी पैसे नाहीत रे महाराजा...आमचे बालगोपाळ कामानिमित्त दरदिवशी आपल्या वाहनाने कामाला जातात व परत येतात रे महाराजा... त्यांना सुखरुप ठेव रे महाराजा...आणि सरकारला रस्त्यावरचे खड्डे बुजवायला चांगली बुद्धी दे रे महाराजा’’. विशेष म्हणजे लोक वाहने थांबवून हे गाऱ्हाणे व भजन ऐकत होते. यावेळी मगोचे (MG Party) नेते प्रवीण आर्लेकर, नरेश कोरगावकर, माजी सरपंच चंद्रशेखर खडपकर, उगवे -तांबोसे-मोप उपसरपंच सुबोध महाले, पक्षाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुदीप कोरगावकर, प्रवक्ते उमेश तळवणेकर आणि कायकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी आजगावकर यांच्यावर तोंडसुख घेताना ते फक्त कमिशन लाटत असल्याचा आरोप केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.