Goa Politics: मांद्रेकरांनी बेताल वक्तव्य थांबवावित: संजय बेर्डे

पंचवीस वर्षे आमदार तसेच त्यानंतर मंत्रीपद भोगलेल्या मांद्रेकर यांनी वेळीच येथील रस्त्यांकडे लक्ष दिले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती असे बर्डे यांनी पुढे सांगितले.
Sanjay berde Goa NCP
Sanjay berde Goa NCPDainik Gomantak

शिवोली: शिवोलीतील (siolim) मतदारांनी मागच्या निवडणुकीत चुक केली असे म्हणण्याचा नैतिक अधिकार याभागातील माजी आमदार तथा मंत्री असलेल्या दयानंद मांद्रेकर यांना मुळीच नसून सतत पंचवीस वर्षे शिवोली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या मांद्रेकर यांनी शिवोलीत आतापर्यंत काय दिवे लावले याची इंत्यभुत माहिती स्थानिक मतदारांना आहे त्यामुळे यापुढे तरी अशी बेताल वक्तव्ये दयानंद मांद्रेकर यांनी प्रसार माध्यमांसमोर न करण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंगेसचे (NCP) सरचिटणीस संजय बर्डे यांनी शिवोलीत केले. मार्ना शिवोली तसेच परिसरातील रस्त्यांची झालेल्या दुर्दशेसंबंधात संजय  बर्डे बोलत होते. (Goa NCP Leader Sanjay Berde criticized Dayanand Mandrekar)

पंचवीस वर्षे आमदार तसेच त्यानंतर मंत्रीपद भोगलेल्या मांद्रेकर यांनी वेळीच येथील रस्त्यांकडे लक्ष दिले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती असे बर्डे यांनी पुढे सांगितले. दरम्यान, 2017 च्या निवडणुकीत अल्पमतात आलेल्या भाजपने सरकार बनवण्यासाठी गोवा फॉरवॉर्डच्या तीन आमदारांची मदत घेतली होती परंतु अडीच वर्षाच्या कालावधीनंतर आपले काम फत्ते होताच त्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला, युज एन्ड थ्रो  ही तर भाजपची संस्कृतीच असल्याचे त्यांनी पुढे बोलतांना सांगितले.

Sanjay berde Goa NCP
Goa: जे पी नड्डा यांनी घेतले ब्रह्मेशानंद यांचे आशीर्वाद

दयानंद मांद्रेकर हे भाजपच्या राज्य समितीचे उपाध्यक्ष आहेत शिवाय राज्यात भाजपचेच सरकार आहे असे असतांनाही शिवोलीतील चाळण झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे त्यांनी आपले  लक्ष कां वेधले नाही असा सावाल बर्डे यांनी यावेळी उपस्थित केला. मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आदी मंडळी शिवोलीमार्गेच पेडणे तालुक्यात प्रवेश करतात, मात्र  येथील रस्त्यांकडे त्यांचे अद्याप  लक्ष जात नाही या गोष्टीचे आश्चर्य वाटत असल्याचे बर्डे यांनी सांगितले. 

दरम्यान, येत्या पाच ऑगस्ट पर्यत येथील रस्त्यांची तात्पुरती डागडुजी न केल्यास मार्ना येथील सेंट एन्थॉनी चर्च पासून मार्ना क्रॉस रोड पर्यत मानवी साखळी उभारुन येथील राजकीय लोकांचा जाहीर निषेध करण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते संजय  बर्डे यांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com