Girkarwada Dainik Gomantak
गोवा

Goa: जीवरक्षक मेलविन डिसौझांनी कंपनी अधिकाऱ्याच्या सतावणूकीतून केली आत्महत्या

ह्या अन्यायाविरुद्ध आम्ही गप्प बसणार नाही,आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

दैनिक गोमन्तक

गिरकरवाडा येथील जीवरक्षक मेलविन डिसौझा (Melvin D'Souza) यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी शांताराम राणेंच्या (Shantaram Rane) सतावणुकीमुळे आत्महत्या केली असून,अधिकारी राणे यांना त्वरित निलंबित करावे व कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. ह्या अन्यायाविरुद्ध आम्ही गप्प बसणार नाही,आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

मयत मेलविन जुनसवाडा टॉवरच्या सेवेत जीवरक्षक म्हणून गेली 10 वर्षे सेवा बजावीत होते.त्या काळात त्यांनी चांगले काम केले होते व सहकाऱ्यात तो फार प्रेमळ होता.दृष्टी कंपनीचा वरिष्ठ अधिकारी शांताराम राणे यांच्याकडे त्यांनी रजा मागितली होती.रविवारी 26 रोजी,मेलविन व सर्व मित्रगण वेलांकनी मद्रासला निघणार होते.मात्र अधिकारी राणे यानी मेलविन यांची रजा नामंजूर केली.वास्तविक जुनसवाडा टॉवर मध्ये अनेक अतिरिक्त कर्मचारी असून त्यांच्या सेवेबद्दल आक्षेप घेण्यासारखे खूप गोष्टी आहेत.परंतु मेलविन यास मद्रासला (Madras) जाण्यास परवानगी नाकारल्याने त्यानी घरी धाव घेतली व चिठ्ठी लिहून पँटच्या खिशात ठेवली व घरातील स्नानगृहात गळफासाने आत्महत्या केल्याचे बहीण ऑफेलिया डिसौझा यांनी सांगितले.सदर अधिकारी राणे याला त्वरित कामावरून काढून टाकावे व मेलविन यांच्या कुटुंबास आर्थिक हातभार द्यावा असे ऑफेलिया हिने सांगितले.

त्या चिठ्ठीत ,तो (राणे)आपल्याच माणसांना सांभाळून घेतो,आम्हाला दुययम वागणूक देत असतो,असे लिहून ठेवल्याचे ओफेलिया हिने सांगितले.स्थानिकांना रोजगार संधी असते,मात्र राणे सारखे अधिकारी स्थानिक बेरोजगार इच्छुकांना डावलण्याचे कारस्थान करीत आहेत,असे ह्यावरून दिसून आले.

दृष्टीच्या सेवेत कार्यरत असताना दुपारच्या जेवणास एक तासांची सुट्टी होती.त्या अवधीत जेवण आटोपून कामावर रुजू होण्याची गरज असते.मात्र कामावरून घरी पोचायच्या अगोदरच सदर अधिकारी त्याला फोन करून बोलावून घ्यायचा, नीटपणे जेवण घ्यायला वा हात धुवायला सुद्धा वेळ देत नसे एवढी सतावणुक चालली होती,असे मयत मेलविन यांची आई रोफिना डिसौझा यांनी सांगितले. आमच्या वाड्यावरील अनेक युवक दृष्टी कंपनीत कामाला होते.कित्येकांना सतावणुक करून त्यांना नकोसे करण्यात अधिकारी वावरत होते.मात्र अशी परिस्थिती अन्य कोणावरही येऊ नये असे म्हणावेसे वाटते.आमची मेलविन यांच्याप्रति सहानभूती असून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिक आलेसिन रोद्रीगिश यांनी केली आहे.ज्या मंडळीनी ह्या प्रकारास मूक समंती दिली, जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.आपणास कामावरून कमी करण्याची शक्यता असल्याचे मेलविन यांनी आईला सांगितले होते.

ही दुसरी घटना---

एक दोन वर्षांपूर्वी ह्या टॉवरवरील एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती.त्यावेळेस त्यानीही सदर अधिकाऱ्याचे नाव दिले होते.पोलिसांनी त्या अधिकाऱ्यास बोलावून घेत जबाब नोंदविला, मात्र कारवाई झाली नव्हती असे जेम्स डिसौझा यांनी सांगितले. परवाच्या घटनेनंतर आम्ही टॉवरला भेट दिली असता,राणे रजेवर असल्याचे खोटे सांगितले. मात्र अधिकारी गौरेश सावंत जेव्हा मेलविन यांच्या निवासस्थानी आले असता, आम्ही मित्रांनी राणेंशी संपर्क करण्याची विनंती सावंत याना केली.त्याना, राणे यांनी आपण टॉवरवर दुपारी 3.30 पर्यत होतो असे सांगितले. मात्र आम्हा मित्रांना त्यांनी खोटी माहिती का दिली,असा सवाल जेम्स यांनी व्यक्त केला.सदर अधिकारी धादांत खोटे बोलत असून जबाबदारी झटकण्याची गेम करीत असून तीच मंडळी मेलविन यांच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचे म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif: भारताला शत्रू म्हटले, युद्ध जिंकल्याचा केला दावा, शेवटी शांततेसाठी मागितली भीख; पाकच्या पंतप्रधानांचा युएनमध्ये थापांचा पाऊस

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT