Goa Medical College Dainik Gomantak
गोवा

Goa Medical College: गोमेकॉत उंदरांचा सुळसुळाट; रुग्णांच्या सुरक्षेसाठी तातडीने पेस्टकंट्रोल करा, वीरेश बोरकरांची मागणी

Goa Medical College Rat Menace: रुग्ण बरे होण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) येतात; उंदरांनी पायाला चावा घेऊन पुन्हा आजारी पडण्यासाठी नव्हे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: रुग्ण बरे होण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) येतात; उंदरांनी पायाला चावा घेऊन पुन्हा आजारी पडण्यासाठी नव्हे. त्यामुळे गोमेकॉतील उंदरांच्या उपद्रवाची सरकारने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पेस्टकंट्रोल करून रुग्णांना या त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी आमदार वीरेश बोरकर यांनी शून्य प्रहरावेळी केली.

गोमेकॉत अलीकडे उंदरांचा वावर आढळून येत असल्याचे बोरकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. रुग्णालयातील कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी व्हिजिटिंग समिती नेमण्याची तरतूद आहे. मात्र, या समितीची प्रत्यक्षात अंमलबजावणी होते का, याचीही सरकारने पाहणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

त्रुटी आढळल्यास कडक कारवाई : मुख्यमंत्री

या प्रकाराची पडताळणी करण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार चौकशी करून नेमक्या त्रुटी कोणत्या आहेत, याची पाहणी केली जाईल आणि योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Team India Players Retirement: रोहित शर्मा, मोहम्मद शमी... युवा खेळाडूंची एन्ट्री, दिग्गजांची एक्झिट! 2026 मध्ये टीम इंडियाचे 'हे' 5 दिग्गज घेणार निवृत्ती?

Maje Ghar Scheme: पालिका जमिनीवरील घरांनाही दिलासा द्या! 'माझे घर' योजनेत आमदार आमोणकरांची मागणी

Atal Asra Scheme: घर बांधणीसाठी 4, तर दुरुस्‍तीसाठी 2 लाखांपर्यंतच्‍या अनुदानाचा प्रस्‍ताव; अटल आसरा, साडेचार वर्षांत 5,075 जणांना लाभ! फळदेसाई

8th Pay Commission: सिव्हिलियन कर्मचाऱ्यांनाही मिळणार 'वन रँक वन पेन्शन'? निवृत्तीची तारीख कोणतीही असो, पेन्शन समान मिळणार? 8व्या वेतन आयोगाचा मास्टरप्लॅन

Goa Casino: 'हे तर होणारच होते, पुढेही होतच राहणार!' कॅसिनोच्या विळख्यात बदललेल्या गोव्याची अस्वस्थ करणारी कहाणी

SCROLL FOR NEXT