Mayem Law College Protest Dainik Gomantak
गोवा

Mayem Law College: 'लॉ कॉलेज' विरोधात मयेवासीयांनी थोपटले दंड! ग्रामसभा ठरली वादळी; प्रकल्पाविरोधात सर्वानुमते ठराव संमत

Mayem Law College Protest: आंतरराष्ट्रीय पातळीवरील कायदा महाविद्यालयाच्या मुद्यावरुन मवेवासीय संघटित झाले असून, नियोजित प्रकल्पाच्या विरोधात त्यांनी दंड थोपटले आहेत.

Manish Jadhav

डिचोली: आंतरराष्ट्रीय पातळीवरील कायदा महाविद्यालयाच्या मुद्यावरुन मयेवासीय संघटित झाले असून, नियोजित प्रकल्पाच्या विरोधात त्यांनी दंड थोपटले आहेत. आज (2 फेब्रुवारी) झालेल्या मये-वायेंगिणी पंचायतीच्या ग्रामसभेत मयेवासीयांनी या प्रकल्पाविरोधात रोष व्यक्त केला. मये गावात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कायदा महाविद्यालय नकोच, अशी भूमिका घेत त्यांनी गोंधळही घातला. मयेतील जिव्हाळ्याचा कस्टोडियन मालमत्ता प्रश्न कायमस्वरुपी जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत पंचायतीने गावावर कोणत्याही प्रकारचा प्रकल्प लादू नये, अशी एकमुखी भूमिका मयेवासीयांनी घेतली. कायदा महाविद्यालयाच्या प्रश्नावरुन ग्रामस्थांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सरपंच कृष्णा चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली मये वायंनिणीची ग्रामसभा पार पडली.

ग्रामस्थ आक्रमक

पंचायत सचिव महादेव नाईक यांनी ग्रामसभेत पंचायत मंडळ लोकांच्या बाजूने नियोजित महाविद्यालयाच्या प्रश्नावरुन सरपंच चोडणकर यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. या प्रकल्पासंदर्भात अलीकडेच उच्च शिक्षण संचलनालय आणि भू-सर्वेक्षण खात्याकडून पंचायतीला पत्र आले, असे सांगून पंचायतीने त्यासंद‌र्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले. प्रकल्पासंदर्भात पंचायत मंडळाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी लोकांनी लावून धरली. तेव्हा उपस्थित पंचायत मंडळाने उभे राहून लोकांच्या मागणीला अनुमोदन दिले.

दरम्यान, ग्रामसभेस सरपंचांसह दिलीप शेट, वासुदेव गावकर, विशांत पेडणेकर, कनिवी कवठणकर, सुवर्णा चोडणक्कर, सीमा आरोंदेकर, वर्षा गडेकर आणि सौ. पोछे हे पंचसदस्य उपस्थित होते. उपसरपंच सुफला चोपडेकर आणि पंचसदस्य विद्यानंद कारबोटकर अनुपस्थित होते. स्थानिक तथा गोवा फॉरवर्डचे नेते संतोषकुमार सावंत, मये भू-विमोचन नागरिक समितीचे अध्यक्ष सखाराम पेडणेकर, सचिव प्रा. राजेश कळंगुटकर, माजी पंचसदस्य कृष्णा परब, नागेश नाईक, कालिदास कवळेकर आदी ग्रामस्थ सुरुवातीपासूनच आक्रमक दिसले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT