Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: होली स्पिरिट चर्चमध्ये चोरी करणाऱ्याला अटक

Goa News: फातोर्डा पोलिसांनी आरोपी ॲलेक्स ऊर्फ सूर्या मेथ्यू याला सिकंदराबाद येथे अटक करून गोव्यात आणले.

दैनिक गोमन्तक

Goa News: चार महिन्यापूर्वी मडगाव येथील होली स्पिरिट चर्चच्या मुख्य पाद्रीच्या कक्षात जाऊन कपाटात ठेवलेली दीड लाख रुपयांची रक्कम चोरण्याचा आरोप असलेल्या ॲलेक्स ऊर्फ सूर्या मेथ्यू (38) याला फातोर्डा पोलिसांनी सिकंदराबाद येथे अटक करून गोव्यात आणले.

काल त्याला मडगाव न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 8 दिवसांच्या पोलीस कोठडीचा रिमांड देण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी तपास चालू ठेवला होता. सदर चोरटा सिकंदराबाद येथे रहात असल्याची माहिती मिळाल्यावर फातोर्डा पोलिस स्थानकाचे हवालदार निलेश कासकर व विल्टन रिबेलो यांनी त्याला तेलंगणा राज्यात जाऊन अटक केली.

अटक केलेला मेथ्यू हा अट्टल चोरटा असून त्याने अन्य काही राज्यातही अशाच चोऱ्या केल्याची माहिती असून त्याला त्या चोऱ्या प्रकरणी यापूर्वी अटकही झाली होती. या चोरट्याकडून पोलिसांनी 53,500 रूपये रोख जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक गिरेंद्र नाईक पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT