Goa Government: गोवा प्रेमींकडून म्हापशात फुटीर आमदारांचा निषेध!

Goa Government: म्हापशात दिवाळीच्या पूर्वसंध्येला 'आमदारचोरासुर' या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन केले.
Goa Government
Goa GovernmentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Government: पैशांच्या जोरावर भाजप सरकारने काँग्रेसचे आमदार चोरले, असा आरोप करत फुटीर आमदारांच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी काल रविवारी ‘गोवा प्रेमी’ या झेंड्याखाली समविचारी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत म्हापशात दिवाळीच्या पूर्वसंध्येला ‘आमदारचोरासुर’ या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन केले.

नोव्हेंबरमध्ये समांतर शॅडो सरकारची स्थापना करीत यापुढे विद्यमान सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत गोव्याची अस्मिता राखणार असल्याची घोषणा काँग्रेसचे नेते तथा उत्तर गोवा माजी जिल्हाध्यक्ष विजय भिके यांनी यावेळी केली.

Goa Government
Goan News: कुठ्ठाळी ग्रामसभेत कचरा तापला!

भिके म्हणाले, सरकारने जनतेचा कौल चोरला असून, पैशा व सत्तेच्या जोरावर त्यांनी आमदारहरण केले. यापुढे सरकारच्या चुकीच्या धोरणांवर नजर ठेवण्यासोबतच, त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी समांतर शॅडो सरकारची स्थापन करणार आहोत.

शिवसेनेचे राज्यप्रमुख जितेश कामत म्हणाले, सध्या भाजप सरकार हे स्वतःला देश, धर्म व देवापेक्षा मोठे समजत आहे. अशा वृत्तीला वेळीच आळा घालण्याची गरज आहे. त्यामुळे प्रतिकात्मक निषेध म्हणून या सत्तासुराचे काल दहन केले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा फॉरवर्डचे संतोष कुमार सावंत, सुभाष केरकर, सुदेश तिवरेकर, प्रिया राठोड तसेच इतर पदाधिकारीउपस्थित होते.

फुटिरांना सुरक्षा पुरवा

पैशांच्या जोरावर फुटीर आमदारांना हाताशी धरून भाजप सरकारने जनतेचा विश्वासघात केला. या फुटीर आमदारांना आता सरकारने सुरक्षा पुरवावी. कारण त्यांच्या जीवाला धोका आहे. या नेत्यांनी जनतेसोबत देवाचीही फसवणूक केली. या प्रकारामुळे लोक खवळले असून, कुणीही कधीही त्यांच्यावर रोष काढू शकतो, असे गिरीश चोडणकर यावेळी म्हणाले.

Goa Government
Goa News: गोव्यात विद्यार्थ्यांनी दिले कचरा व्‍यवस्‍थापनाचे धडे!

भाजप कार्यकर्त्यांनी क्रांती करावी: आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा म्हणाले की, केवळ प्रतिमा जाळून पक्षांतर थांबणार नाही. मात्र, ही गोष्ट लोकांच्या मनावर सतत बिंबवावी लागणार आहे. त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे.

निवडणुकीवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारांच्या पराभवासाठी मेहनत घेतली. मात्र, त्यांच्या सरकारने काय केले? अशावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांना पक्षातच राहून क्रांती करावी लागेल, असे म्हणत फेरेरा यांनी भाजप सरकारच्या कृतीचा निषेध केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com