टीव्हीएस मोटर कंपनीने (TVS Motor Company) गोव्यात आयोजित केलेल्या 'मोटोसूल ५.०' (MotoSoul 5.0) या रायडर महोत्सवात ८,००० हून अधिक रायडर्सनी हजेरी लावली. या कार्यक्रमात कंपनीने आपली नवी बाईक 'टीव्हीएस रोनिन आगोंदा' (किंमत १,३०,९९०) आणि २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 'अपाचे आरटीएक्स अॅनिवर्सरी एडिशन' बाईकचे अनावरण केले.
यासोबतच, रोनिन केंसाई आणि अपाचे आरआर ३१० स्पीडलाईन (Apache RR310 Speedline) या दोन कस्टम-मेड बाईक्स, तसेच 'आर्ट ऑफ प्रोटेक्शन' ही मर्यादित आवृत्तीची हेल्मेट मालिका प्रदर्शित करण्यात आली. पहिल्या दिवशी एफएमएक्स स्टंट्स, रायडरस्फेअर, डर्ट आणि फ्लॅट ट्रॅक स्पर्धा, आणि बादशाह तसेच डीजे अकबर सामी यांच्या सादरीकरणाने रायडर संस्कृतीचा उत्सव साजरा करण्यात आला.
होंडा येथे रस्त्त्यावरून चाललेल्या एका दुचाकीस्वारावर अचानक झाडाची मोठी फांदी कोसळून अपघात झाला. या अपघातात दुचाकीचा चालक गंभीर जखमी झाला असून, दुचाकीचेही नुकसान झाले आहे. जखमी चालकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केल्यानंतर रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी पोस्टनुसार, परब काँग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत की, गोवा फॉरवर्ड पक्षाच्या माध्यमातून तरी पक्षांतर केलेल्यांना युतीमध्ये प्रवेश मिळू नये. यावरून हे स्पष्ट होते की, युतीमध्ये राहण्यापेक्षा, युतीच्या धोरणांवर आणि सदस्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न मनोज परब करत आहेत.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी धारगळ जिल्हा पंचायत मतदारसंघातून श्रीकृष्ण हरमलकर आणि तोरसे जिल्हा पंचायत मतदारसंघातून राघोबा कांबळी यांनी आज भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज सादर केला. अर्ज भरण्यापूर्वी या दोन्ही उमेदवारांनी देवी भगवतीचे आशीर्वाद घेतले. यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पाळी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुंदर नाईक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची विशेष उपस्थिती होती. उमेदवारी अर्ज भरताना कार्यकर्त्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले.
नगरगाव जिल्हा पंचायत निवडणूकीसाठी धुळू धोंडो शेळके यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-२० क्रिकेट स्पर्धेत गोव्याने जम्मू आणि काश्मीरवर सात विकेट्सनी विजय मिळवला. कश्यप बखले (५९) आणि कर्णधार सुयश प्रभुदेसाई (नाबाद ५१) यांच्या स्टायलिश अर्धशतकांच्या बळावर गोव्याने १६२ धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि १९ षटकांत ३ बाद १६७ धावा केल्या. स्पर्धेतील एलिट ग्रुप बी मध्ये गोव्याचा हा चौथा विजय होता.
लोणावळा येथील लायन्स पॉईंट परिसरात कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन गोमंतकीय तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मयूर वेंगुरलेकर (वय २४) आणि योगेश सुतार (वय २१) अशी मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. या अपघातामुळे गोव्यात हळहळ व्यक्त होत आहे.
गोवा फॉरवर्ड पक्षाचे (GFP) आमदार विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचा पक्ष काँग्रेस पक्षासोबत युतीमध्ये आहे. मात्र, जिल्हा पंचायत (ZP) निवडणूक 'तू तू मैं मैं' साठी नाही. सरदेसाई म्हणाले की, काँग्रेस, आरजीपी (RGP) आणि गोवा फॉरवर्ड या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन संयुक्त बैठक घेणे आवश्यक होते, पण अशी एकही बैठक झाली नाही. याचा परिणाम असा झाला की, आम्ही कधीही एका समान अजेंड्यावर पोहोचू शकलो नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.