Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Crime News: थिवीत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली

Crime News: विवाहितेच्या खूनप्रकरणी तरुणास कर्नाटकमधून अटक

दैनिक गोमन्तक

Crime News: तीन दिवसांपूर्वी धानवा-थिवी येथील एका विहिरीत संशयास्पद अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख अखेर पटली असून तो यल्लामा बेकिनाल (35, मूळ बिजापूर-कर्नाटक) या विवाहित महिलेचा आहे.

दरम्यान, माडेल-थिवी येथे राहणाऱ्या यल्लामा नागाप्पा ऊर्फ नागेश बेकिनाल या विवाहितेचा गळा चिरून तिला विहिरीत टाकून खून केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी संशयित मंजुप्पा ऊर्फ मंजू नहजंत्री (39, मूळ हावेरी-कर्नाटक) यास अटक केली. शुक्रवार, 4 रोजी हा खुनाचा प्रकार उघडकीस आला होता. तेव्हा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून हे प्रकरण नोंद केले होते.

याप्रकरणी पोलिसांनी यल्लामाचा कथित प्रियकर मंजुप्पा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला. संशयित हावेरी-कर्नाटक येथे असल्याची माहिती मिळताच पोलिस पथक रविवारी रात्रीच कर्नाटकला रवाना झाले. संशयित आपल्या नातेवाईकांच्या घरी लपून बसला होता.

सोमवारी सकाळी तेथील स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने पोलिस पथकाने संशयित मंजुप्पा याच्या मुसक्या आवळल्या व त्याला गोव्यात आणून रितसर अटक केली.

उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना, उपअधीक्षक जिवबा दळवी, निरीक्षक परेश नाईक, निरीक्षक सोमनाथ माजिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंदार परब, सुशांत सांगोडकर, सोनम वेरेंकर तसेच हवालदार रामा नाईक, कॉन्स्टेबल प्रकाश पोळेकर, अक्षय पाटील व सदाशिव परब या पथकाने ही कामगिरी केली.

प्रियकराने संशयातून केला खून

धानवा येथे पडीक घरात हा खुनाचा प्रकार गेल्या १४ ऑक्टोबर रोजी सकाळी घडला होता. यल्लामाची दुसऱ्या व्यक्तीसोबत झालेली मैत्री संशयिताला आवडली नव्हती. यातूनच त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यावेळी संशयिताने यल्लामाचा खून केला व कमरेला दगड बांधनू तिला पडक्या विहिरीत टाकूले होते.

सकाळी गेलेली आई परतली नसल्याची माहिती तिच्या अल्पवयीन पंधरा वर्षीय मुलाने आपल्या वडिलांना दिली. यल्लामाचा पती दुसऱ्या दिवशी थिवी येथे आला व मुलास घेऊन घरी गेला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT