Mapusa Municipality Dainik Gomantak
गोवा

बेकायदा व्यापारी संकुल बंद करण्याचा म्हापसा मुख्याधिकाऱ्यांचा आदेश

सामाजिक कार्यकर्ता जवाहरलाल शेट्ये यांनी सातत्याने केलेल्या तक्रारी व पाठपुराव्यानंतर हा आदेश जारी

Dainik Gomantak

Goa: काणका बांध येथील आत्माराम गडेकर यांनी म्हापसा (Mapusa) येथील कार्व्हाल्हो पेट्रोल पंपनजीक उभारलेले बेकायदा भव्य व्यापारी संकुल (Illegal Commercial building) सीलबंद करण्याचा आदेश म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी क्लेन मदेरा (Mapusa Municipality Chief officer Clein Madera) यांनी दिला आहे.

सामाजिक कार्यकर्ता जवाहरलाल शेट्ये यांनी सातत्याने केलेल्या तक्रारी व पाठपुराव्यानंतर हा आदेश जारी करण्यात आला आहे. या संकुलासंदर्भात शासकीय यंत्रणांकडून यथायोग्य परवाने न घेण्यात आल्याने हा आदेश जारी करण्यात आल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी आदेशपत्रात नमूद केले आहे.

तक्रारींना अनुसरून म्हापसा पालिकेने या संकुलाची पाहणी केली असता त्या ठिकाणी अवैधरीत्या व्यवसाय चालत असल्याचे निदर्शनास आले होते. पालिकेने आणि उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणानेही त्या संकुलाला परवाना अथवा ‘ना हरकत दाखला’ दिला नाही, हे चौकशीअंती सिद्ध झाले.

तसेच गोवा पालिका अधिनियमांखाली आवश्यक असलेले अन्य परवानेही गडेकर यांनी मिळवले नव्हते.यासंदर्भात पालिकेने गडेकर यांना ते व्यापारी संकुल पाडण्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावून कायदेशीर कागदपत्रे सादर करण्यास कळवले होते; तथापि, त्या बाबतीत त्यांना अपयश आले होते.


सर्व व्यवहार बंदचा आदेश


व्यापारी संकुलातील सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच, या संकुलाला सील ठोकण्याचे आदेश त्यांनी पालिकेचे निरीक्षक विकास कांबळे आणि शेखर गावस यांना दिले आहेत. त्यांनी त्या संकुलातील सर्व साहित्य १ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता जप्त करून त्यासंदर्भातील कार्यवाही अहवाल आपणांस सादर करावा, असेही त्या आदेशपत्रात नमूद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT