गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई व इतर
गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई व इतर Dainik Gomantak

पक्ष विलीन करण्याच्या अटीमुळेच तृणमूलशी बोलणी बंद

विजय सरदेसाई: गोयकारपणाशी कुठल्याही बाबतीत तडजोड नाही
Published on

Goa: राष्ट्रीय स्तरावर भाजपकडे (BJP) तृणमुलने (TMC) यशस्वी टक्कर दिल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे आकृष्ट झालो होतो, ही गोष्ट जरी खरी असली तरी गोवा फॉरवर्ड पक्ष (Goa Forward Party) त्या पक्षात विलीन करावा ही त्यांची अट आम्ही कोणत्याही परिस्थितीत मान्य करायच्या तयारीत नव्हतो, यासाठीच आम्ही ही बोलणी बंद केली अशी माहिती आज गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Goa Forward President Vijay Sardesai) यांनी देतानाच 'गोयकारपण' हे ब्रीद डोळ्यांसमोर ठेवून स्थापन केलेला हा पक्ष कुठल्याही परिस्थितीत दुसऱ्या पक्षात विलीन करणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.

गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई व इतर
पेडणे तालुक्यात उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन

फातोर्ड्यात शेतकऱ्यांना भाजीचे बियाणे आणि खते वितरित करण्यासाठी आज त्यांच्या कार्यालया जवळ कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना सरदेसाई म्हणाले, भाजपला शह देण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायला पाहिजे असे मला अजूनही वाटते. अधिक पक्ष रिंगणात असल्यास मतविभागणीचा फायदा निश्चितच भाजपला जाणार आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत अशी युती व्हावी यासाठी आमचा प्रयत्न चालू असेल त्यासाठी काही तडजोडी करायला लागल्या तर त्याही करायची आमची तयारी आहे असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com