Rainfall  Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023 : मुसळधार पावसाची राज्यात पुन्हा दमदार ‘एन्ट्री’

पडझड सुरूच; ७८ लाखांची हानी ः बहुतांश धरणांची पातळी पोहोचली ७० टक्क्यांवर

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon 2023 : राज्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाने काहीकाळ दडी मारल्यानंतर पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासात राज्यभरात १२३.५ मि.मी पावसाची नोंद झाली असून धरण क्षेत्रात मुसळधार पडत आहे. यामुळे अजुंणे वगळता राज्यातील बहुतांश धरणांची पाण्याची पातळी ७० टक्क्यांच्यावर पोहचली आहे. त्यामुळे वर्षभराचा तरी पाणीप्रश्‍न सुटल्याने जलस्त्रोत खात्याने सुटकेचा निश्‍वास सोडला आहे.

गेल्या २० दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे ७८ लाख रुपयांची हानी झाली असून अग्निशमन आणि आपत्कालिन यंत्रणेने दीड कोटींची मालमत्ता वाचवण्यात यश मिळवले आहे.राज्यात शुक्रवारी झालेल्या पावसामुळे विविध ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. वार्का येथे घरावर झाड पडून लाखाची हानी झाली,तर फोंड्यात संरक्षक भिंत कोसळून दोन वाहनांची हानी झाली. विविध ठिकाणी सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले होते.

यंदाच्या हंगामात उशिरा दाखल होऊनही गेल्या २० दिवसात सरासरी ओलांडून १२.८ टक्के अतिरिक्त पाऊस पडला आहे. आत्तापर्यंत सरासरी १३८८.७ मिमी पडणे अपेक्षित असताना १५६६.८ मिमी पाऊस बरसला आहे.हंगामातील आत्तापर्यंतच्या पावसामध्ये २८ जून रोजी १४२.५ मिमी इतका सर्वाधिक पाऊस झाला होता. त्यानंतर ६ जुलै रोजी १३१.२ मि.मी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर गुरूवारी सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती.

सध्या पाऊस कमी असला तरी २० जुलैनंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार होण्याची शक्यता असून पुढील आठवड्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांसाठी राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या आठवडाभरात पडलेल्या पावसामुळे धरण साठ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अंजुणे वगळता राज्यातील बहुतांश धरणे ७० टक्क्यांच्यावर भरली आहेत.

जुने गोवेत सर्वाधिक पाऊस

मागील २४ तासांत सर्वाधिक १५७ मि.मी पाऊस जुने गोवे येथे बरसला असून त्या खालोखाल केपे येथे १५० मि.मी., सांगे येथे १४८ मि.मी. मडगाव येथे ११३ मि.मी., आणि पणजी येथे ११० मि.मी., तर दाबोळी येथे १०७ मि.मी आणि म्हापसा १२९.२ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: बाहेरच्या लोकांमुळे 'सुशेगाद' गोव्याची शांतता भंग! गोमंतकीयांना RG-गोवा फॉरवर्डच्या युतीत दिसतोय 'आशेचा किरण'

Senior T20 cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: साखळी नगरपालिकेवर सौरऊर्जा प्रकल्प; पालिकेला मिळणार 30 केव्ही वीज

SCROLL FOR NEXT