Pernem News : 'आजोबा’ला 2024 चौ.मी.जमीन ‘दान’

अखेर मंदिर समितीला यश : भक्तांना साजरा करता येणार उत्सव
Pernem News
Pernem Newsgomantak digital
Published on
Updated on

मोरजी : मांद्रे पंचायत क्षेत्रातील आजोबा मंदिर परिसरात मागच्या तीन वर्षांपूर्वी एकूण ५९२५ चौ. मी. जमीन अनिल शर्मा, हिमाचल प्रदेश ,अरुण भल्ला उत्तर प्रदेश आणि रोहित खेर, उत्तराखंड यांनी आजोबा मंदिरासहित मूळ मालकांकडून ही जमीन विकत घेतली होती. त्यानंतर या व्यावसायिकांनी तिथे आलिशान कॉटेज रेस्टॉरंट उभारले होते.

मांद्रे सरपंच अमित सावंत,पंच सदस्य किरण सावंत यांच्यासह देवस्थान समितीने प्रयत्न केल्यामुळे अखेर देवस्थानाला हक्काची जागा मिळाली. ही जमीन दानपत्राद्वारे देण्याची प्रक्रिया आश्वे येथील श्री आजोबा मंदिर परिसरात झाली.

Pernem News
Morjim News : भूमिगत वीजवाहिनीचे काम झाले, आता रस्ते कधी सुधारणार?

सविस्तर माहिती अशी, मंदिरासह ही जमीन विकली गेल्यामुळे देवस्थान समितीला भाविकांना भक्तगणांना उत्सव साजरा करताना अडचणी येत होत्या. त्या संदर्भात अनेकदा सरकारला निवेदने दिली. पंचायत, स्थानिक आमदार जीत आरोलकर यांच्याकडेही देवस्थान समितीने कैफीयत मांडली. देवस्थान समितीच्या संबंधित खरेदीदारांसोबत वेळोवेळी बैठका झाल्या.मात्र,तोडगा निघत नव्हता.

Pernem News
Morjim News : मोरजी किनारी पलंग थाटून अतिक्रमण! बेकायदा शॅक्स व्यवसाय सुरूच

अखेर देवस्थानच्या प्रयत्नांना यश आले. देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ एकजूट राहिल्यामुळे अखेर संबंधितांना देवस्थानची जमीन देवस्थानाला सोडावी लागली. आणि हा जो एक निर्णय झालेला आहे .तो ऐतिहासिक निर्णय असून अखेर न्याय मिळाला.

Pernem News
Morjim News : एका लॅपटॉपवर ‘आधार’ त्रासदायक! पेडणेतील नागरिकांची गैरसोय

-किरण सावंत, स्थानिक पंच देवस्थान ही जमीन असताना मूळ मालकांकडून दिल्लीतील एका उद्योजकाने स्थानिक आणि देवस्थान समितीला विश्वासात न घेता ही जमीन परस्पर विकत घेतली. त्यानंतर वाद सुरू झाला होता. परंतु ग्रामस्थ ग्रामस्थ देवस्थान समिती आणि पंचायत मंडळ समितीच्या मागे खंबीर असल्यामुळे शेवटी संबंधितांना ही जमीन देवस्थानाला सोडावी लागली.

-अमित सावंत, सरपंच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Sarvan Comunidade land scam
Goa Comunidade Land Grab Allegations
Bicholim Land Fraud Goa
Goa High Court denies bail in land scam case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com