Pernem News : पेडणेतील ‘थीम पार्क’ला विरोध

या प्रकल्पास हरकती नोंदवितानाच या प्रकल्पाविरुद्ध लढा देण्यासाठी अन्याय निवारण समितीची स्थापना करण्याचे ठरवण्यात आले
Pernem Theme Park
Pernem Theme ParkDainik Gomantak
Published on
Updated on

Pernem : राज्यात काही ठिकाणी विरोध झालेले प्रकल्प पेडणे तालुक्यावर लादण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही तो सहन करणार नाहीत, असा इशारा पेडणे येथे काल झालेल्या नागरिकांच्या बैठकीत घेण्यात आला. गोवा सरकारच्या राजपत्रातून पेडणे येथे थीम पार्क प्रकल्प सुरू करण्यासंबंधीचा मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर येथे ही बैठक बोलावण्यात आली होती.

या बैठकीला पेडणे तालुक्याच्या विविध भागातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत मुदतीपूर्वी या प्रकल्पाला या प्रकल्पास हरकती नोंदवितानाच या प्रकल्पाविरुद्ध लढा देण्यासाठी अन्याय निवारण समितीची स्थापना करण्याचे ठरवण्यात आले. विजय विर्नोडकर व सूर्यकांत तोरसकर यांनी थीम पार्कचे काम सुरू झाले, त्यावेळी पेडणे उपजिल्हाधिकारी व पेडणे नगरपालिकेत तक्रार करून सुरू केलेले काम बंद कसे पडले याबद्दल माहिती दिली.

Pernem Theme Park
Goa Tourism - Digital Nomad संकल्पनेतून गोव्याच्या पर्यटनाला मिळेल चालना - रोहन | Gomantak Tv

ॲड जितेंद्र गावकर, राजन कोरगावकर, दाजी कासकर, प्रणव परब, उदय महाले, प्रदीप नाईक, भास्कर नारुलकर, सदानंद वायंगणकर यांनी विचार व्यक्त केला.

भले होणार नाही!

भारत बागकर म्हणाले, थीम पार्कमुळे कोणाचेही भले होणार नसून त्यातून मोठे नुकसानीच होणार आहे. मंत्री गुदिन्हो यांनी हा प्रकल्प दोन ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा साल्ढानांनी विरोध केला होतो. आज हा प्रकल्प पेडणे तालुक्यावर लादत आहेत, त्याला पेडणेकरांचा प्रखर विरोध आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com