Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

Manoj Parab: 'निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत पण हिंमत आहे'; गोवावासीय आम्हाला नक्कीच साथ देतील

Manoj Parab- लोकसभा निवडणुकीसाठी गोव्यात उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरु- परब

Ganeshprasad Gogate

Manoj Parab आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कसोशीने प्रयत्न करीत असून उत्तर गोव्यात माझ्यासह अजय खोलकर, तर दक्षिणेत रुबर्ट परेरा, शैलेश नाईक आणि विश्वेश नाईक अशी तीन नावे आहेत.

नावे निश्चित करण्यासाठी आमच्या निवडणूक समितीची बैठक होणार असून आमचे उमेदवार लोकशाही प्रक्रियेद्वारे निवडले जातात.

आम्ही गुप्त मतपत्रिकेत मतदान करण्यास सांगितले आणि त्यांना उत्तर आणि दक्षिण गोव्यासाठी नावे सुचवण्यास सांगितले अशी माहिती आरजीचे मनोज परब यांनी गोमंतकीशी बोलताना दिलीय

राज्यात काँग्रेसने केलेल्या गलथान कारभारामुळे लोकांनी काँग्रेसला रिजेक्ट केलंय. थोड्या प्रमाणात जे काही काँग्रेसचे उमेदवार निवडून आले असले तरी त्यांना हवा तितका विकास करता आला नाही आणि हे चित्र गोमंतकीयांसमोर आहे. त्यामुळे त्यांनी यापुढे कोणाला मतदान करायचे हे ठरवावे असेही परब म्हणाले.

आम्ही विधानसभा निवडणूक लढवली तेव्हाही आमच्या खात्यात फक्त 1-2 लाख होते. आता आमच्याकडे निवडणूक लढवल्यासाठी पैसे नाहीत पण हिंमत आहे. या निवडणुकीत गोवावासीय आम्हाला साथ देतील याची खात्री आहे.

दोन्ही जागा लढवण्यासाठी आम्हाला अडीच कोटींची गरज आहे, सर्व खर्चाचा तपशील आम्ही आमच्या वेबसाइटवर टाकला आहे. गोवावासीय आम्हाला देणगी देतील असा विश्वास असल्याचेही परब म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT