Bison Attack Dainik Gomantak
गोवा

Bison Attack: मांद्रेत गव्याचा धुमाकूळ! काजूच्या बागेत कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर हल्ला, जीएमसीत उपचार सुरू

Mandrem Bison Attack: मांद्रेतील सावंतवाडा परिसरात शनिवारी दुपारी गव्याच्या हल्ल्यात एक वृद्ध शेतकरी गंभीर जखमी झाला.

Sameer Amunekar

मांद्रे: मांद्रेतील सावंतवाडा परिसरात शनिवारी दुपारी गव्याच्या हल्ल्यात एक वृद्ध शेतकरी गंभीर जखमी झाला. काजूच्या बागेत कामासाठी गेलेल्या या शेतकऱ्यावर अचानक गव्याने झडप घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

काजू बागेत हल्ला

सावंतवाडा येथील ६५ वर्षीय शेतकरी नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी १ च्या सुमारास आपल्या काजूच्या बागेत कामासाठी गेले होते. यावेळी झुडपात दबा धरून बसलेल्या एका गव्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. गव्याच्या धडकेत शेतकरी गंभीररीत्या जखमी झाले.

जखमी शेतकऱ्याला तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले होते. मात्र, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास बराच उशीर झाला.

त्यांना प्रथम उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु जखमांचे गांभीर्य पाहून डॉक्टरांनी त्यांना तातडीने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) हलवण्याचा सल्ला दिला. सध्या त्यांच्यावर जीएमसीमध्ये उपचार सुरू आहेत.

ग्रामस्थांचा संताप

या घटनेनंतर मांद्रे आणि सावंतवाडा परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतील आणि शेतीमधील वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, वन विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. ग्रामस्थांनी वन्यप्राण्यांच्या घुसखोरीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Team India Controversy: विराटच्या कसोटी निवृत्तीचं 'गंभीर' कनेक्शन? 'RO-KO'ला वनडेतून डच्चू देण्याची तयारी? 'कोल्ड वॉर'वर 'BCCI'चा मोठा खुलासा

NIT Theft Case: एनआयटीत चोरी; फटिच्या प्राध्यापकाक धरलो आंध्रप्रदेशात

Goan Food Culture: 'कापे' म्हटली की ती बटाट्याचीच आणि 'फोडी' म्हटल्यावर त्या बटाटेतर...

Mandovi Bridge: हौशी पणजीकर नव्या पुलावरून नदी ओलांडायचा आनंद उपभोगू लागले; मांडवी नदीवरील सेतू

Goa Accident: बिट्स पिलानी कॅम्पसच्या गेटसमोर थरार; ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले, कोल्हापूरच्या तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT