मैत्रिणीकडे जाते सांगून निघालेल्या मुलीला फसवून पळवलं, लैंगिक अत्याचार प्रकरणी नराधमाला 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा कायम; हायकोर्टाचा मोठा निकाल

Bombay High Court Goa Bench Judgment: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पॉक्सो विशेष न्यायालयाने ठोठावलेली १० वर्षांची सक्तमजुरी आणि ५० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने कायम ठेवली आहे.
Bombay High Court Goa Bench Judgment
Bombay High Court Goa BenchDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: नावेली येथील संशयित सेफ्टीन रझा कोसंबी याने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पॉक्सो विशेष न्यायालयाने ठोठावलेली १० वर्षांची सक्तमजुरी आणि ५० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने कायम ठेवली आहे.

सप्टेंबर २०१७ मध्ये ‘मैत्रिणीकडे जाते’ असे सांगून घरातून बाहेर पडलेली १७ वर्षांची पीडित मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. याबाबत पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर तपासादरम्यान ती संशयित कोसंबी याच्यासोबत असल्याचे उघड झाले. संशयिताने तिला फसवून गोव्याबाहेर नेले होते. काही दिवसांनी पोलिसांनी दोघांना मडगाव येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. या प्रकरणी पॉक्सो विशेष न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत १० वर्षांची सक्तमजुरी आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. या निर्णयाला आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

Bombay High Court Goa Bench Judgment
Goa Crime: डिचोलीतील 'सेतू संगम'च्या सुरक्षेत त्रुटी, संशयास्पद मृतदेह सापडल्याने खळबळ

निकालात काय?

न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले की, घटनेच्या वेळी पीडित मुलगी १७ वर्षे ४ महिने वयाची होती, म्हणजेच ती कायद्यानुसार ‘बाल’ या संज्ञेत मोडते. पॉक्सो कायद्यानुसार अल्पवयीन मुलीची संमती ग्राह्य धरली जात नाही आणि अशा प्रकारचा संबंध हा लैंगिक अत्याचारच मानला जातो. पीडितेच्या वैद्यकीय तपासणी व फॉरेन्सिक अहवालातून अत्याचाराचे पुरावे स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे विशेष न्यायालयाने ११ एप्रिल २०२५ रोजी दिलेला निकाल योग्य असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com