Goa Coconut Price: नारळासह करवंटीलाही आला भाव! इंधन-प्लायवूड निर्मितीसाठी वापर; 100 रुपयांना एक टोपली दराने विक्री

Goa Coconut Rate: सध्या नारळाचे दर वाढलेले असतानाच करवंटीलाही बाजारात मागणी वाढली आहे. गावागावांत करवंट्या विकत घेणाऱ्या गाड्या फिरू लागल्या आहेत.
Goa Coconut Price
Goa Coconut PriceDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: सध्या नारळाचे दर वाढलेले असतानाच करवंटीलाही बाजारात मागणी वाढली आहे. गावागावांत करवंट्या विकत घेणाऱ्या गाड्या फिरू लागल्या आहेत. शंभर रुपयांना एक टोपली या दराने करवंट्या विकत घेतल्या जातात. या करवंट्यांपासून इंधनाची निर्मिती करण्यात येत असल्याची तसेच या करवंट्यांचा भुसा करून त्यापासून प्लायवूडची निर्मिती केली जात असल्याची माहिती देण्यात आली.

माडाचा कोणताही भाग टाकावू नसतो म्हणून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटले जाते. करवंटीपासून हस्तकलेच्या वस्तू करणे सर्वज्ञात आहे. मात्र, आता करवंटीचा इंधन तयार करण्यासाठीही वापर होऊ लागला आहे.

Goa Coconut Price
Goa Coconut Price: गोमंतकीयांसाठी खुशखबर! वर्षभराच्या महागाईनंतर ‘नारळ’ झाला स्वस्त; नागरिकांना दिलासा

करवंटीपासून कृतिशील कार्बन तयार केले जाते, ज्याचा वापर पाणी शुद्धीकरणासाठी आणि सोने-चांदी शुद्धीकरणासाठी होतो. तसेच अगरबत्ती निर्मितीमध्येही याचा वापर होतो. नारळाच्या करवंटीपासून डिझेल किंवा बायो-ऑइल तयार करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे. ‘पायरोलिसिस’ नावाच्या प्रक्रियेद्वारे, ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत करवंटी गरम करून त्यापासून बायो-ऑइल, चारकोल आणि गॅस मिळवता येतात.

Goa Coconut Price
Goa Coconut Price: गोवेकरांवर 'नारळ' का रुसलाय? बाजारात तुटवडा कायम; दर अजून भडकलेलेच

सध्या नारळाचा दर

आकाराप्रमाणे ८० भरतीचा नारळ ३८ हजार रुपये, ९० भरतीचा नारळ ३६ हजार रुपये, १०० भरतीचा नारळ ३५ हजार रुपये, १२० भरतीचा नारळ ३३ हजार रुपये, १८० भरतीचा नारळ ३० हजार रुपये, २५० भरतीचा नारळ २४ हजार रुपये असा दर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com