Goa Assembly Budget Session: विधानसभेचे स्थगित अधिवेशन पुन्हा बोलावण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे 'मौन'; राज्यपालांच्या सूचनेनंतरही प्रमोद सावंतांनी विषयावर बोलणे टाळले

CM Pramod Sawant Silence: राज्‍यपाल पुसापती गजपती राजू यांनी याबाबत निर्णय घेण्‍याची सूचना सरकारला केलेली असतानाही मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी या विषयावर बोलणे पूर्णपणे टाळले.
CM Pramod Sawant Silence
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: विधानसभेचे स्‍थगित करण्‍यात आलेले अर्थसंकल्‍पीय अधिवेशन पुन्‍हा घेण्‍यात यावे, अशी मागणी विरोधी आमदारांकडून होत असताना आणि राज्‍यपाल पुसापती गजपती राजू यांनी याबाबत निर्णय घेण्‍याची सूचना सरकारला केलेली असतानाही मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी या विषयावर बोलणे पूर्णपणे टाळले.

राज्‍य विधानसभेचे अर्थसंकल्‍पीय अधिवेशन ६ ते २७ मार्च या कालावधीत आयोजित करण्‍यात आलेले होते. परंतु, अधिवेशनाचे सात दिवसांचे कामकाज पूर्ण झालेले असतानाच भारतीय निवडणूक आयोगाने फोंडा पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी करीत दक्षिण गोव्‍यात आचारसंहिता लागू केली. अशा स्‍थितीत अधिवेशनात कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा करता येणार नसल्‍याने सरकारने १६ मार्च रोजी अधिवेशन स्‍थगित केले. त्‍यामुळे आमदारांची अनेक खासगी विधेयके विधानसभेत चर्चेला आलेली नव्‍हती. त्‍यात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार विजय सरदेसाई यांनी सादर केलेल्‍या माजी न्‍यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांच्‍या कृषी जमीन संवर्धन विधेयकाचाही समावेश होता.

CM Pramod Sawant Silence
Goa Assembly Budget Session 2024 3rd Day: क्रीडा स्पर्धा, 39 A, GST, ऑनलाईन कॅसिनो; अधिवेशनात तिसऱ्या दिवशी काय घडलं?

दरम्‍यान, अधिवेशन स्‍थगित करीत असताना फोंडा पोटनिवडणूक पार पडल्‍यानंतर पुन्‍हा अधिवेशन बोलावून उर्वरित विषयांवर चर्चा करण्‍याचे संकेत मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेले होते. त्‍यानुसार उच्च न्‍यायालयाने फोंडा पोटनिवडणूक रद्द केल्‍यानंतर युरी आलेमाव आणि विजय सरदेसाई यांनी अधिवेशन पुन्‍हा बोलावण्‍याची मागणी सरकारकडे केलेली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

cm pramod sawant
Pramod Sawant Mapusa Fish Market Visit
Goa Politics
Goa Assembly three day session
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com