Heavy Rain  Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: ‘तिलारी’तून विसर्ग शक्‍य; डिचोली, पेडणेतील 'या' गावांना सतर्कतेचा इशारा

पुढील चार दिवस राज्यात ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Tillari Dam News राज्‍यात मुसळधार सुरू असून, पावसाने इंचांची पंचाहत्तरी पार केली आहे. उद्या, शनिवारीही ही स्थिती राहिल्यास अनेक ठिकाणी पूरजन्‍य स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. सत्तरी, पेडणेसह सांगे, केपे तालुक्यांत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी जनजीवन विस्कळीत झाले होते.

तेरेखोल, कुशावतीसह अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे; तर तिलारी धरणातून आज पाण्‍याचा विसर्ग होण्‍याची शक्‍यता असून डिचोली, पेडणे तालुक्‍यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्‍यात आला आहे. पावसाचा जोर उद्याही (शनिवारी) असाच राहण्याची शक्यता असून, पुढील चार दिवस राज्यात ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

गावणे, आमठाणे भरण्याच्या मार्गावर

धरण क्षेत्रांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने पंचवाडीसह साळावली धरण भरून वाहत आहे, तर गावणे आणि आमठाणे धरण भरण्याच्या मार्गावर आहे. अंजुणे धरणही ५० टक्के भरल्याची माहिती जलस्रोत खात्याने दिली आहे. गावणे धरण ९६.५ टक्के भरले असून आमठाणे धरण ९४.४ टक्के भरले आहे.

साळ, मेणकुरे, चांदेल भागांसाठी इशारा

तिलारी नदी क्षेत्रातील दोडामार्ग तालुक्यातील (सिंधुदुर्ग) कोनाळकट्टा, घोटगेवाडी, परमे, घोटगे, खानयाळे-आवाडे, मणेरी, कुडासे, साटेली -भेडशी तर गोवा राज्यातील इब्रामपूर, हणखणे, चांदेल, हसापूर, कासारवर्णे, वारखंड, मेणकुरे, साळ या गावांतील ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोठे काय घडले ?

  • तेरेखोल शापोरा कडशी नदीकिनारी एकाएकी पूरस्थिती

  • मोपा कडशी येथील एकूण दहा कुटुंबीयांचा संपर्क तुटला

  • कुशावती नदीला पूर, पारोडा पूल व रस्ता पाण्याखाली

  • पर्याय म्‍हणून वाहतूक चांदरमार्गे वळविण्यात आली

  • मडगाव-केपे दरम्‍यान मुख्य रस्‍त्‍यावर बराच काळ पाणी; वाहतूक विस्कळीत

  • अनेक भागांत झाडे पडून लाखो रुपयांचे नुकसान

  • सत्तरीतील सोनाळ-तार रस्‍त्‍यावर म्‍हादई नदीचे पाणी

तिलारीच्या जलसाठ्यात वाढ

पाणी सोडणार : नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

चार दिवसांपासून तिलारी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे.

त्यामुळे धरणातील पाणी बाहेर सोडण्याचे नियोजन आखण्यात आले असून या पाण्यामुळे धोका, नुकसान होऊ नये, यासाठी उपविभागीय अधिकारी, तिलारी धरण उपविभाग क्र.२ यांच्याकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. पाणीसाठा अधिक वाढल्यास धरणातील पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती संबंधित सूत्रांकडून देण्यात आली.

तिलारी शीर्षकामे उपविभाग क्र.२ यांच्याकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या निवेदनात २० जुलै तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यवृष्टीमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे.

अतिरिक्त पाणी नियंत्रित पद्धतीने ''पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्याचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने २२ जुलै रोजी खळग्यातील दगडी धरणातून पाणी तिलारी नदी सोडण्यात येत आहे. धरण क्षेत्राबाहेरील पाणलोट क्षेत्र, खरारी नाल्यातील पाणी नदीपात्रात आल्याने नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नदीपात्रातील प्रवाह कधीही वाढू शकतो, तो तेव्हा नदी परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, रात्रीच्या वेळी सदर नदी पात्रातून ये-जा करू नये, नदी पात्रात कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला, नदी पात्रात पाण्यासाठी गुरे सोडणारे शेतकरी यांनी याबाबत सतर्कता बाळगावी.

नदीकाठच्या व इतर सर्व ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा गाव पातळीवरुन दवंडी देण्यात यावी, अशी माहिती अधिकारी ग. दि. बुचडे यांनी दिली.

या गावांनी खबरदारी घ्यावी

नदी क्षेत्रातील दोडामार्ग तालुक्यातील कोनाळकट्टा, घोटगेवाडी, परमे, घोटगे, खानयाळे-आवाडे, मणेरी, कुडासे, साटेली -भेडशी तर गोवा राज्यातील इब्रापूर, हणखणे, चांदेल,हसापूर, कासरवर्णे, वारखंड या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, अशी सूचना संबंधितांतर्फे करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

SCROLL FOR NEXT