महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत सेंट झेवियर्स, गोवा वैद्यकीय महाविद्यालय विजेते

कार्तिक अय्यर, नजिदा शेख सर्वोत्तम खेळाडू
Table Tennis Tournament
Table Tennis TournamentDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Table Tennis Tournament : गोवा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत म्हापशाच्या सेंट झेवियर्सने महिलांत, तर बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने पुरुष गटात विजेतेपद पटकावले. स्पर्धा पेडे-म्हापसा येथील इनडोअर स्टेडियममध्ये झाली.

वैयक्तिक गटात गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचा कार्तिक अय्यर पुरुषांत, तर महिलांत सेंट झेवियर्सची नजिदा शेख सर्वोत्तम खेळाडू ठरली.

सांघिक महिला गटात सेंट झेवियर्सचे नजिदा हिच्याव्यतिरिक्त स्तुती शिवानी, लिओना लोबो, क्लेअर गोम्स, ज्वेल फर्नांडिस यांनी, तर पुरुष गटात गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्तिक याच्यासह मायरन परेरा. डॅरिन फर्नांडिस, अंशुल साधले, रजनीश सिंग यांनी प्रतिनिधित्व केले.

Table Tennis Tournament
Dabolim Airport : दाबोळीत फनेल झोनमधील घर पाडले; अन्य 10 घरांवर टांगती तलवार

अंतिम निकाल

महिला गट : सेंट झेवियर्स महाविद्यालय वि. वि. गोवा वैद्यकीय महाविद्यालय, ३-१ (नजिदा शेख वि. वि. साची केरकर ११-६, ११-८, ११-६, स्तुती शिवानी वि. वि. अबिगेल कुन्हा ११-५, ६-११, ६-११, ११-६, ११-८, लिओना लोबो पराभूत वि. अरुंधती रमेश ६-११, ३-११, २-११, नजिदा वि. वि. अबिगेल ११-७, ११-८, १०-१२, १२-१०).

पुरुष गट : गोवा वैद्यकीय महाविद्यालय वि. वि. डॉन बॉस्को महाविद्यालय-पणजी, ३-० (मायरन परेरा वि. वि. अश्विन कुंकळीकर ११-८, ११-३, १४-१२, कार्तिक अय्यर वि. वि. शौनक पैंगीणकर ११-४, ११-३, ११-८, डॅरिन फर्नांडिस वि. वि. लाबान मिनेझिस ११-६, ११-५, ११-५).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa ESIC Medical College
Goa New MBBS Medical College Approval 2027 28
Vishwajit Rane GMC Visit
Goa Medical Violence Act Section 7
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com