Tillari Dam News: तिलारी धरण होणार ओव्हरफ्लो; जलस्त्रोत खात्याने दिला 'हा' इशारा

म्हादई, खांडेपार, वाळवंटी, शापोरा नद्यांची पाणी पातळी वाढणार
Tillari Dam News
Tillari Dam Newsgoogle image

Tillari Dam News: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सर्व पाणीसाठे आता पुन्हा भरत आले आहेत. शनिवारी २२ जुलै रोजीही असाच पाऊस राहिल्यास तिलारी धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

सध्या तिलारी धरणाची पाणी पातळी इशारा पातळीवर आहे. तथापि, असाच पाऊस राहिल्यास धरण उद्या, ओव्हरफ्लो होऊ शकते. अर्थात त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. तथापि, सतर्क राहण्याची गरज आहे. कारण या धरणातील विसर्गामुळे गोव्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते.

Tillari Dam News
Goa Drugs Seized: गोवा क्राईम ब्रँच पथकाचा छापा; 5 लाख रूपयांचे अमली पदार्थ जप्त, उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्याला अटक

त्या पार्श्वभुमीवर जलस्त्रोत खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. म्हादई, खांडेपार, डिचोली, वाळवंटी, शापोरा या नद्यांची पाणी पातळी वाढू शकते, असे विभागाने म्हटले आहे. सध्या या नद्या अद्याप इशारा पातळीच्या खालूनच वाहत आहेत.

पण पाण्याची पातळी वाढू शकते, त्यामुळे नदीत उतरू नये, असे जलस्त्रोत विभागाने म्हटले आहे. सध्या राज्यात सर्वदूर चांगला पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात आणखी काही दिवस अतिवृष्टीचा इशारा वर्तवला आहे.

गुरूवाची राज्यातील प्रमुख धरणांपैकी एक असलेले साळावली धरण भरले होते. शिवाय राज्यातील इतरही धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com