Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: म्हादईच्या मुद्द्यावर सिद्धरामय्या- मोदींची भेट; प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरीची केली मागणी

Mahadayi Water Dispute: कामासाठीची निविदा काढण्यात आली असून फक्त 'पर्यावरणीय मंजुरी' हा विषय प्रलंबित आहे- सिद्धरामय्या

Ganeshprasad Gogate

Mahadayi Water Dispute: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन ''म्हादईच्या मुद्द्यावर त्वरित निर्णय घेऊन प्रकल्पाला लवकरात लवकर पर्यावरणीय मंजुरी द्यावी'' अशी मागणी केलीय.

पंतप्रधानांनी मंजुरी दिल्यास म्हादई प्रकल्प पुढे जाऊ शकेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. म्हादई हा विषय अगोदरच गॅझेटमध्ये असून दुसरा अन्य कोणताही साइड ब्लॉक नाही.

या कामासाठीची निविदा काढण्यात आली असून फक्त 'पर्यावरणीय मंजुरी' हा विषय प्रलंबित आहे. केंद्राकडून मंजुरी मिळताच हे काम सुरू करता येईल असे देखील त्यांनी म्हटल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर झालंय.

कर्नाटक राज्याला दुष्काळमुक्ती मिळाली पाहिजे यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली उच्च शक्ती समितीच्या बैठकीची मागणी त्यांनी केली होती.

पण केंद्राला तीन वेळा आवाहन केले तरी प्राथमिक बैठक घेतली गेली नाही म्हणूनच आम्ही पंतप्रधानांना विनंती करुन तातडीने बैठक घेऊन भाग दुष्काळमुक्त करण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केलंय.

गोमंतकीयांसाठी ही महत्वाची बातमी असून केंद्राकडून याबाबत कोणता निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT