Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'समोसा-कचोरी नको, सगळ्यांनी मिळून शीतकढी जेवा!' सरदेसाईंची महाआघाडीची हाक; 'ही गोमंतकीयांची इच्छा' म्हणत पुढच्या राजकीय खेळीचे संकेत

Vijay Sardesai Mahaaghadi Statement: सर्व विरोधी पक्षांनी एकत्रितरीत्या महाआघाडी करून भाजपविरोधात लढावे, ही तमाम गोमंतकीयांची इच्छा आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: सर्व विरोधी पक्षांनी एकत्रितरीत्या महाआघाडी करून भाजपविरोधात लढावे, ही तमाम गोमंतकीयांची इच्छा आहे. स्वाभिमानी गोवेकरांचा पक्ष या नात्याने या भावनेची कदर करणे हे आमचे कर्तव्य आहे, अशा शब्दांत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आपली पुढील राजकीय खेळी काय असेल, याचे संकेत दिले.

गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्ष एकत्र आल्याची सूचना देणारे होर्डिंग्ज आज गोवा फॉरवर्डने हटविल्यानंतर त्यावरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच, गोव्याच्या जनतेला याक्षणी प्रमुख विरोधी पक्षाला लक्ष्य करणे योग्य वाटत नाही.

जनतेच्या या भावनांची कदर करून आम्ही ही होर्डिंग्ज हटविली आहेत. यापुढे गोव्याच्या जनतेला ज्या प्रकारची होर्डिंग्ज हवीत, त्या प्रकारची होर्डिंग्ज लावली जातील. सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जावे, अशी जनतेची इच्छा आहे आणि जनतेची इच्छा डावलणाऱ्यांना जनताही झिडकारते, असे त्यांनी म्हटले.

जनतेला समोसा-कचोरी नको

सरदेसाई म्हणाले की, गोव्याच्या जनतेला मानकुराद आंबा पाहिजे. त्याजागी त्यांना हापूस आंबा दिला, तर तो आवडणार नाही. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन ‘शीतकढी’ जेवावी, असे लोकांना वाटत आहे. त्यांना समोसा आणि कचोरी नको आहे. तुमची पूर्वीची राजकीय भूमिका बदलली कशी, असे विचारले असता, ‘मी कान आणि डोळे उघडे ठेवून चालणारा माणूस आहे. सर्व विरोधकांनी एकत्र यावे, असे गोवेकर ओरडून सांगत आहेत. त्यांचा आवाज एवढा मोठा आहे की, कानाने कुणी बहिरा असेल तरी त्यालाही तो ऐकू येईल. हा आवाज सध्याच्या घडीला नाकारून चालणार नाही. मला तो आवाज ऐकू आला आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

लवकर जाहीर करेन निर्णय

काँग्रेससोबत जाणार का, किंवा ‘आप’सोबतची युती तुटली का, असा प्रश्न विचारला असता, सध्या पितृपक्ष सुरू आहे. त्यामुळे या काळात आम्ही कुठलाही मोठा निर्णय घ्यायचा नाही, असे ठरविले आहे. यापूर्वी पितृपक्ष सुरू असताना काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांची गत काय झाली, ते सर्वांना माहीत आहे. त्यामुळे मी माझे महत्त्वाचे निर्णय पितृपक्ष संपल्यानंतरच जाहीर करेन. पण सर्वांनी एकत्र येऊन महाआघाडी करावी, असे मलाही वाटते, असे त्यांनी सांगितले.

विधानसभा रौप्यमहोत्सव कार्यक्रमावर विजयचा बहिष्कार

एका बाजूने गोवा राज्य प्रशासनाचा गाडा हाकण्यासाठी कर्ज घेत असताना विधानसभा संकुलाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमावर ५ कोटी रुपये खर्च करणे योग्य नसल्याचे नमूद करत, या अवाजवी खर्चामागे भ्रष्टाचाराची शक्यता असल्याचे सांगत विजय सरदेसाई यांनी कार्यक्रमावर बहिष्कार घातला.

सभापती गणेश गावकर यांना लिहिलेल्या पत्रात सरदेसाई यांनी ९ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात आपण सहभागी होणार नसल्याचे कळविले आहे.

या विधानसभा संकुलाचे उद्घाटन मार्च २००० मध्ये झाले होते. या नव्या संकुलात पहिले अधिवेशनही मार्च २००० मध्ये झाले होते. त्यामुळे हा रौप्यमहोत्सव २०२५ मध्ये होण्याची गरज होती. नव्या विधानसभा संकुलाने २७व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर हा सोहळा का आयोजित करण्यात आला?’ असा सवाल सरदेसाई यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assembly Silver Jubilee: रौप्यमहोत्सवात राजकीय सामना रंगला! युरींच्या टीकेला मुख्यमंत्री सावंतांचे जोरदार प्रत्युत्तर; वाचला 'डबल इंजिन' सरकारच्या विकासाचा पाढा

UPI Payment Tracking: स्कूलच्या फीपासून हॉस्पिटलच्या बिलपर्यंत... युपीआय पेमेंट्स ठरणार देशाच्या आर्थिक विकासाचा आरसा; MoSPI कडून मोठा प्रस्ताव

Goa Politics: सोयरिक तुटल्यात जमा! गोवा फॉरवर्डने 'गोवा फर्स्ट'चे होर्डिंग्ज काढले; आपसोबतच्या युतीवरून गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

Horoscope 7 October 2026: गुंतवणुकीसाठी शुभ दिवस, बँक बॅलेन्समध्ये होणार तगडी वाढ! बुधवार ठरणार 'या' राशींसाठी गोल्डन डे

Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

SCROLL FOR NEXT