Goa Politics: सोयरिक तुटल्यात जमा! गोवा फॉरवर्डने 'गोवा फर्स्ट'चे होर्डिंग्ज काढले; आपसोबतच्या युतीवरून गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

Goa Forward AAP Alliance: गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्ष यांनी एकत्र येऊन ‘गोवा फर्स्ट’ नावाने केलेली युती तुटण्याच्या मार्गावर आहे.
Goa Forward AAP Alliance
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्ष यांनी एकत्र येऊन ‘गोवा फर्स्ट’ नावाने केलेली युती तुटण्याच्या मार्गावर आहे, अशी अटकळ व्यक्त होत असतानाच आज हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याचे सूचित करणारे गोव्यात कित्येक ठिकाणी लावलेले होर्डिंग्ज गोवा फॉरवर्डनेच हटविल्याने या दोन्ही पक्षांनी केलेली सोयरिक तुटल्यात जमा आहे.

गोवा फॉरवर्ड पार्टी आणि आम आदमी पक्षाचे होर्डिंग्ज हटविल्याने गोव्यात राजकीय युद्ध पेटले आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सांगितले, की हे होर्डिंग्ज हटविणे म्हणजे विरोधी पक्षांच्या व्यापक ‘महाआघाडी’साठी लोकांमध्ये वाढणारी भावना व्यक्त होत आहे. त्याला पसंती देण्याच्या दृष्टीने टाकलेले पाऊल, अशी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Goa Forward AAP Alliance
Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

जेव्हा विरोधी पक्षांमध्ये एकता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तेव्हा मुख्य विरोधी पक्षाला लक्ष्य करण्यात काही अर्थ नाही, असे गोव्याच्या जनतेला वाटू लागले आहे. मी लोकांच्या या भावनांचा आदर करतो. हे होर्डिंग्ज गोवा फॉरवर्डनेच लावले होते आणि आम्हीच स्वतःहून ते काढले आहे, हेही त्यांनी मान्य केले.

तर ‘हॅटट्रिक’ शक्य

‘आप’चे कार्याध्यक्ष जर्सन गोम्स म्हणाले, आम्ही हे होर्डिंग्ज लावले नव्हते. ते विजय सरदेसाई यांनी डिझाईन केले होते आणि त्यांनीच लावले होते. त्यामुळे आता ते पक्षांतर करणाऱ्या पक्षाशी हातमिळवणी करण्याचा विचार करत असावेत, म्हणूनच त्यांनी ते होर्डिंग्ज हटवले असतील," असा आरोप गोम्स यांनी केला. त्यांच्या या भूमिकेमुळे यंदाही पक्षांतराची ‘हॅटट्रिक’ साधण्यास मदत होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

Goa Forward AAP Alliance
Goa Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com