Goa Islands Boundary: सरकारी बेटांचे प्रत्यक्ष सर्वेक्षणच नाही! गुगल अर्थच्या आधारे माहिती; 'सीझेडएमपी 2019'मधील समावेशाचा प्रश्न ऐरणीवर

CZMP 2019 Goa: राज्य सरकारच्या मालकीच्या बेटांची माहिती बंदर कप्तान खात्याकडे असली तरी प्रत्यक्षात त्या बेटांची पाहणीच झाली नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
CZMP 2019 Goa
Goa Islands BoundaryDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्य सरकारच्या मालकीच्या बेटांची माहिती बंदर कप्तान खात्याकडे असली तरी प्रत्यक्षात त्या बेटांची पाहणीच झाली नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. यामुळे पर्यावरण खात्याने बेटांची माहिती मागितल्यावर बंदर कप्तान खात्याने गुगल अर्थच्या माध्यमातून माहिती पर्यावरण खात्याला दिली आहे.

गोव्याच्या किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा २०१९ अंतिम करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यावरण व हवामान बदल खात्याने विविध सरकारी खात्यांकडून अतिरिक्त माहिती, सूचना आणि आवश्यक भौगोलिक माहिती मागविली आहे. या प्रक्रियेत राज्यातील बेटांची माहिती आणि त्यांचे स्थान आराखड्यात समाविष्ट करण्याचा मुद्दा पुढे आला आहे. मात्र, बेटांच्या प्रत्यक्ष सीमा निश्चित करण्यासाठी अद्याप जमिनीवरील सर्वेक्षणाची माहिती उपलब्ध झालेली नाही.

CZMP 2019 Goa
Goa Weather: गोव्यात पुढील 5 दिवस हवामान राहणार कोरडे! पहाटे गारवा, दुपारी उन्हाचा चटका

बेटांसंदर्भातील माहिती देण्याची जबाबदारी बंदर कप्तान खात्याकडे सोपविण्यात आली होती. त्यानुसार या खात्याने पर्यावरण व हवामान बदल खात्याला गुगल अर्थच्या आधारे तयार केलेल्या बेटांच्या आकारदर्शक नकाशांच्या (शेप फाइल्स) स्वरूपातील माहिती पाठविली. त्यानंतर पर्यावरण खात्याचे संचालक सचिन देसाई यांनी ही माहिती नॅशनल सेंटर फॉर अर्थ सायन्स स्टडीज (एनसीईएसएस) येथील संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविली आहे.

मात्र, बंदर कप्तान खात्याने या माहितीबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. गुगल अर्थच्या आधारे नकाशावर दाखविण्यात आलेली क्षेत्रे ही केवळ बेटांची ठिकाणे दर्शवितात. ती बेटांची अधिकृत भौगोलिक हद्द किंवा सीमा नाहीत, असे खात्याने स्पष्ट केले आहे. प्रत्यक्ष जमिनीवरील माहिती (ग्राउंड डेटा) मिळाल्यानंतर ती पर्यावरण खात्याला पाठविण्यात येईल. त्यानंतर ‘सीझेडएमपी २०१९’ मध्ये आवश्यक सुधारणा किंवा समावेश करता येणार आहे.

CZMP 2019 Goa
Goa Census: जनगणना 2027 साठी स्वयंगणना सुरू! मुख्यमंत्र्यांनी स्वतःची माहिती भरली; बनावट लिंकपासून सावध राहण्याचा इशारा

जमिनीवरील सर्वेक्षण ठरणार महत्त्वाचे

पर्यावरण खात्याने बंदर कप्तान, मत्स्यव्यवसाय, वन, जमीन, नगरविकास, पंचायत आणि पर्यटन खात्यांकडून ‘सीझेडएमपी २०१९’साठी अतिरिक्त माहिती, सूचना व भौगोलिक नकाशे मागवले आहेत. आराखडा लवकर अंतिम करण्यासाठी माहिती संकलित केली जात आहे. मात्र, बेटांच्या बाबतीत गुगल अर्थवरील स्थानदर्शक माहिती आणि प्रत्यक्ष सर्वेक्षणातून निश्चित होणाऱ्या अधिकृत सीमा यांत फरक असल्याने जमिनीवरील सर्वेक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे बेटांचा आराखड्यातील समावेश कसा होणार, याकडे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.