Goa Made Liquor Seized In Kolhapur Dainik Gomantak
गोवा

Kolhapur Crime: कोल्हापुरात 2.50 लाख गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा जप्त; बेळगावच्या एकाला अटक

Goa Made Liquor Seized In Kolhapur: उत्पादन शुल्क गडहिंग्लज विभागाच्या अधिकाऱ्यांंनी तारेवाडी गावच्या हद्दीत, घटप्रभा नदीच्या पुलाजवळ ही कारवाई केली.

Pramod Yadav

कोल्हापूर: फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरात गोवा बनावटीचे पाच लाख रुपये किंमतीचे मद्य जप्त करण्यात आले. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा जप्त करण्यात आलाय.

उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ०२ फेब्रुवारी रोजी घटप्रभा नदीच्या पुलाजवळ ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी बेळगावातील एकाला अटक केली आहे.

जोतिबा जीवनाप्पा भोगण (वय ३१, रा. गणपती गल्ली, बेकीनकेरी, ता. हुक्केरी, बेळगाव ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

त्याच्याकडून गोल्डन एस ब्ल्यू फाईन व्हिस्की १८० मिलीच्या ११०४ सिलबंद बाटल्या आणि ७५० मिलीच्या १९२ बाटल्या असा एकूण दोन लाख ५० हजार ५६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

उत्पादन शुल्क गडहिंग्लज विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, संशयित आरोपी जोतिबा याने मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा जवळ बाळगला असल्याची गुप्त माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली.

अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तारेवाडी गावच्या हद्दीत, घटप्रभा नदीच्या पुलाजवळ जाऊन तपासणी केली असता. संशयित जोतिबाच्या ताब्यात मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा आढळून आला. अधिकाऱ्यांनी मद्यसाठा जप्त केला आहे.

संशयिताविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) ९० नुसार गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, कोल्हापूरमार्गे गोव्यातून येणाऱ्या मोठ्या प्रमाणावर मद्याची तस्करी केली जाते.

गोव्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करुन तस्करी केली जाते. गोवा बनावटीचे मद्य महाराष्ट्रात विक्री करण्यास मनाई आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT