Saligao Murder Case
Saligao Murder CaseDainik Gomantak

Goa Crime: रागाच्या भरात पत्नीच्या गळ्यावर केला वार, कर्नाटकातील विवाहितेचा मृत्यू; संशयित पतीला 7 दिवसांची कोठडी

Saligao Murder Case: मुड्डोवाडो-साळगाव परिसरात भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या गदग (कर्नाटक) येथील दाम्पत्यातील कौटुंबिक वादाचा शेवट पत्नीच्या हत्येत झाला.
Published on

म्हापसा : मुड्डोवाडो-साळगाव परिसरात भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या गदग (कर्नाटक) येथील दाम्पत्यातील कौटुंबिक वादाचा शेवट पत्नीच्या हत्येत झाला. या प्रकरणातील संशयित आरोपी विनोद राठोड (४०) याला शनिवारी स्थानिक न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. प्राथमिक माहितीनुसार, विनोद राठोड याने आपली पत्नी रुक्मिणी राठोड (३६) हिच्या गळ्यावर सुरीने वार केले. त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

Saligao Murder Case
Crime News: वारंवार पैसे मागते, म्हणून पतीने पत्नीला संपविले! साळगावातील धक्कादायक घटनेने राज्य हादरले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये आर्थिक कारणांवरून वारंवार वाद होत होते. मृत रुक्मिणी ही घरखर्चासाठी पैशांची मागणी करत असल्याने दोघांमध्ये तीव्र वाद झाला. या वादातून संतापाच्या भरात विनोदने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Saligao Murder Case
Goa Crime: मायणा-कुडतरीत खळबळ! फूस लावून पळवून अल्पवयीन मुलीचं अपहरण, संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल; पालकांचा गंभीर आरोप

घटनेची माहिती मिळताच साळगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खुनासाठी वापरलेली सुरी जप्त केली असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. शनिवारी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून साळगाव पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com