Goa Crime News: फातोर्डा येथे शाळेसमोर सफाई करताना आढळली मानवी कवटी आणि हाडे; पोलिस करतायेत तपास

Fatorda Goa News: अंबाजी सरकारी प्राथमिक शाळेच्या समोरील जागेची साफसफाई करताना मानवी कवटी आणि दोन हाडे आढळून आली.
Goa Crime News: फातोर्डा येथे शाळेसमोर सफाई करताना आढळली मानवी कवटी आणि हाडे; पोलिस करतायेत तपास
Human SkullDainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा: शाळेसमोर सफाई करताना मानवी कवटी आणि हाडे आढळून आली आहेत. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून, मानवी कवटी कोणाची आणि येथे कोठून आली याबाबत पोलिस तपास करतायेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फातोर्डा येथील अंबाजी सरकारी प्राथमिक शाळेच्या समोरील जागेची साफसफाई करताना मानवी कवटी आणि दोन हाडे आढळून आली आहेत. याप्रकरणी ओल्ड मार्केट परिसरातील एका व्यक्तीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनेची दखल घेऊन घटनास्थळी धाव घेतली.

Goa Crime News: फातोर्डा येथे शाळेसमोर सफाई करताना आढळली मानवी कवटी आणि हाडे; पोलिस करतायेत तपास
Goa Fatal Accident: शिरदोन येथे दुचाकीला भरधाव कारची धडक, ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

यावेळी पोलिसांच्या सोबत फॉरेन्सिक टीम देखील हजर होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन कवटी व हाडे वैद्यकीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आली आहेत. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी अनोखळी व्यक्तीच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

Goa Crime News: फातोर्डा येथे शाळेसमोर सफाई करताना आढळली मानवी कवटी आणि हाडे; पोलिस करतायेत तपास
Betora Gram Sabha: बेतोडा ग्रामसभा गाजली! विविध प्रश्‍नांवरुन खडाजंगी; कचरा प्रकल्पाच्या अर्धवट कामावरुन ग्रामस्थ आक्रमक

वैद्यकीय तपासणीनंतर याप्रकरणी केल्यानंतर सापडलेल्या कवटी आणि हाडांबाबत अधिक माहिती समोर येणार आहे. तसेच, सापडलेली कवटी आणि हाडे यांचा कोणत्या गुन्हेगारी घटनेशी संबंध आहे का? याबाबत देखील पोलिस तपास केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com