Goa Cylinder Stock Dainik Gomantak
गोवा

Goa Cylinder Stock: '15 दिवस पुरेल इतका सिलिंडरचा साठा उपलब्ध', मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती; केंद्राला पाठवणार राज्याचा अहवाल

CM Pramod Sawant Gas Crisis Update: राज्यात सध्या पुढील 15 दिवस पुरेल इतका गॅस सिलिंडरचा साठा उपलब्ध आहे.

Manish Jadhav

LPG Availability Goa  : राज्यात सध्या पुढील 15 दिवस पुरेल इतका गॅस सिलिंडरचा साठा उपलब्ध आहे. प्रत्येक राज्यातील उपलब्ध साठ्याची माहिती केंद्र सरकारने मागितली असून त्याबाबतचा अहवाल आजच (11 मार्च) केंद्राला पाठवून देण्यात येणार आहे. केंद्राच्या निर्देशांनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभा सभागृहात बोलताना सांगितले.

आमदार केदार नाईक यांनी शून्य प्रहराला याबाबतचा प्रश्न विचारला होता. राज्यात सध्या गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रभागात तुटवडा भासत आहे. गॅस एजन्सींना व्यावसायिक आस्थापनांना सिलिंडर न देण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याचा फटका व्यावसायिक आस्थापनांना बसत असून, राज्य सरकारने तत्काळ याबाबत तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गॅस सिलिंडरच्या एजन्सींनी सिलिंडर व्यावसायिक ग्राहकांना देऊ नये असे परिपत्रक मंगळवारी जारी केलेले आहे. याबाबत आपण पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याशीही चर्चा केलेली आहे.

उपायांसाठी तीन सचिवांची समिती स्थापन

राज्यांमधील सिलिंडरच्या साठ्याची माहिती घेऊन पुढील उपाययोजना करण्यासाठी तीन सचिवांची समिती स्थापन केलेली आहे. गोव्यातील (Goa) सध्याच्या साठ्यासंदर्भातील अहवाल या समितीला पाठवण्यात येईल. त्यानंतर केंद्राच्या निर्देशांनुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT