
Stock Market: भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. सोमवारी (12 मे) शेअर बाजार ओपन होताच बीएसईमध्ये 1839.67 अंकांची म्हणजेच +2.32 टक्क्यांची वाढ दिसून आली. तर निफ्टीमध्ये 461 अंकांनी म्हणजेच 1.92 टक्क्यांची वाढ झाली. शेअर बाजारातील या वाढीमुळे गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे झालेले नुकसान भरुन निघाले आहे.
गेल्या आठवड्यात भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे बीएसईमध्ये 880 अंकांनी म्हणजेच 1.10 टक्के घसरण झाली होती तर दुसरीकडे निफ्टीमध्येही 265 अंकांनी म्हणजेच 1.10 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि भारताच्या हवाई हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला. दोन्ही देशात युद्धासारखी स्थिती बनली होती, त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण होते. ज्याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावरही (Stock Market) दिसून येत होता, परंतु 10 मे रोजी म्हणजेच शनिवारी दोन्ही देशांमधील शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर आज बाजारात जबरदस्त तेजी दिसून आली.
सेन्सेक्सच्या 30-शेअर निर्देशांकात, 29 शेअर्स ग्रीन चिन्हावर आहेत म्हणजेच तेजीचा कल कायम आहे. सन फार्माचा एकमेव शेअर जो रेड लाइन म्हणजेच घसरणीत आहे. बीएसईमध्ये सर्वाधिक वाढ अॅक्सिस बँकेच्या शेअरमध्ये झाली. तब्बल 3.72 टक्क्यांनी ही वाढ नोंदवली गेली. यासोबतच, टॉप 5 तेजीच्या शेअर्समध्ये बजाज फायनान्स, इटरनल, अदानी पोर्ट, एनटीपीसी आणि रिलायन्सचे शेअर्स समाविष्ट आहेत.
निफ्टीच्या 50-शेअर निर्देशांकात, 12 शेअर्स तेजीच्या ट्रेंडमध्ये आहेत. यामध्येही लार्सन अँड टुब्रो लिमिटेडच्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये 4.17 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. निफ्टीच्या टॉप 5 तेजीच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास, टायटन, टाटा मोटर्स (Tata Motors), हिरो मोटोकॉर्प, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.