Goa Loksabha Result Shripad Naik led by more than 9500 votes from bicholim constituency of Independent MLA Chandrakant Shetye 
गोवा

Goa Loksabha Election Result: अपक्ष आमदार चंद्रकांत शेट्ये नाईकांच्या साथीला; डिचोलीत भाजपची ‘किमया’

Shripad Naik: भाजप उमेदवाराच्या विजयात मोठे योगदान देऊन साडेनऊ हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळवून देण्याची किमया केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Loksabha Election Result: उत्तर गोव्यातील डिचोली मतदारसंघाने पुन्हा एकदा भाजप उमेदवाराच्या विजयात मोठे योगदान देऊन साडेनऊ हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळवून देण्याची किमया केली आहे. यावेळी झालेल्या ‘सायलेंट’ मतदानामुळे डिचोली मतदारसंघातील भाजपच्या प्रयत्नांना तडा बसणार, असा एक राजकीय अंदाज होता. मात्र हा जाणकारांचा अंदाज फोल ठरविताना डिचोली मतदारसंघातील मतदारांनी यावेळी ‘कमळ’लाच पसंती दिली आहे.

दरम्यान, उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे श्रीपाद नाईक यांनी विजयाची ‘डबल हॅट्ट्रिक’ साधल्याने डिचोलीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. २०२२साली झालेल्या गत विधानसभा निवडणुकीत डिचोलीतून अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेट्ये निवडून आले होते. तर भाजपची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली होती. त्यामुळे लोकसभेची निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक होती.

भाजपचा स्वतःचा आमदार नसला, तरी भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये तसेच भाजपचे माजी आमदार आणि सभापती राजेश पाटणेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेते, आमदार समर्थक आणि कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध प्रचार केल्याने डिचोलीत आघाडी वाढविण्यात भाजपला यश आले आहे. असा सूर मतदारांमधून व्यक्त होत आहे. भाजपला मिळालेली आघाडी ही कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी बाब आहे,असे डिचोलीतील भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले.

काँग्रेसच्या पदरी पुन्हा निराशा

गेल्या दोन विधानसभा निवडणुकींच्या निकालाकडे पाहता डिचोली मतदारसंघात काँग्रेसची अस्तित्वासाठी धडपड सुरू आहे. काँग्रेसकडे तडफदार कार्यकर्त्यांचाही अभाव आहे. तरीही खाणप्रश्न आदी काही प्रश्नांवरुन जनतेमध्ये भाजप विरोधात रोष आहे. असा काँग्रेसचा समज होता. त्यातच काही महिन्यांपूर्वी राजीनामा दिलेले मगोचे नाराज कार्यकर्ते तटस्थ होते.

भाजप सरकारात मगो घटक असल्याने मगोचे कार्यकर्ते भाजप विरोधात राहणार. त्यातच एका माजी आमदाराने भाजप विरोधात ‘छुपी’ भूमिका घेतल्याची चर्चा होती.त्यामुळे डिचोलीत भाजपचे मताधिक्य घटणार,असे काँग्रेसला वाटत होते. मात्र पुन्हा काँग्रेसच्या पदरी निराशा पडली आहे.

मताधिक्क्यात वाढ

श्रीपाद नाईक यांच्या प्रत्येकवेळच्या विजयात डिचोली मतदारसंघाने महत्वाचे योगदान दिले आहे. डिचोली मतदारसंघातून भाजपला पुन्हा एकदा आघाडी मिळाल्याने या मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपचे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. २०१९ साली झालेल्या गत लोकसभा निवडणुकीत डिचोली मतदारसंघातून भाजपचे विजयी उमेदवार श्रीपाद नाईक यांना 8 हजार ०८६ मताधिक्क्य मिळाले होते. यावेळी त्यात वाढ झाली आहे. यावेळी भाजपला ९,७२९ मतांची आघाडी मिळाली आहे.

डॉ. चंद्रकांत शेट्ये, अपक्ष आमदार

भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांचा विजय हा कार्यकर्ते आणि मतदारांचा विजय आहे. या विजयाचे श्रेय केंद्र आणि राज्यातील सरकारसह मतदार आणि कार्यकर्त्यांना जात आहे. भाजप सरकारच्या सहकार्याने डिचोलीत मार्गी लागलेले महत्वाकांक्षी विकास प्रकल्प यामुळे लोकसभा निवडणुकीत डिचोली मतदारसंघात भाजपचे मताधिक्क्य वाढणार. याची खात्री होती. भाजप कार्यकर्त्यांचे प्रयत्न आणि मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाबद्धल मी पूर्ण समाधानी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

Tuberculosis: क्षय रोगाला हद्दपार करण्यासाठी मिळाले स्टार बूस्ट!! वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे 'टीबी ब्रँड ॲम्बेसेडर'

Mormugao Port: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगाम सुरू; एकाच दिवशी कॉर्डेलिया आणि जर्मनीहून जहाजं दाखल

Goa Agriculture: गोव्यात यंदा पोफळीच्या लागवडीत 18 हेक्टरने वाढ! सत्तरीत सर्वाधिक लागवड

SCROLL FOR NEXT