Goa Loksabha Election Result: 'दक्षिणेत धर्माच्या आधारावर मतदान, पहिल्यांदाच आम्ही 2 लाखांहून अधिक मते मिळवली'- भाजप प्रदेशाध्यक्ष

Goa Loksabha Election Result: दक्षिणेत धर्माच्या आधारावर एकगठ्ठा मतदान झाले. काही धर्मगुरूंनीही केलेला हस्तक्षेप निकालामधून दिसून आला आहे.
BJP state president Sadanand Shet Tanawade said that voting was done on the basis of religion in the South Goa constituency
BJP state president Sadanand Shet Tanawade said that voting was done on the basis of religion in the South Goa constituency Dainik Gomantak

Goa Loksabha Election Result: दक्षिणेत धर्माच्या आधारावर एकगठ्ठा मतदान झाले. काही धर्मगुरूंनीही केलेला हस्तक्षेप निकालामधून दिसून आला आहे. पहिल्यांदाच दक्षिणेत भाजपला २ लाखांपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. उत्तरेत भाजपने सहाव्यांदा जागा जिंकून मतांचा विक्रम केला आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष व राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.

पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विजयी उमेदवार श्रीपाद नाईक, आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे, माजी खासदार विनय तेंडुलकर, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट उपस्थित होते.

BJP state president Sadanand Shet Tanawade said that voting was done on the basis of religion in the South Goa constituency
Goa Loksabha Election 2024 Result: दुपारपर्यंत ठरणार गोव्याचे खासदार, दोघांनाही दोन्ही जागांबाबत विश्वास

सदानंद शेट तानावडे पुढे म्हणाले, की कळंगुट, सांताक्रुझ, सांत आंद्रे या तीन मतदारसंघात भाजपला आघाडी मिळाली नाही. पेडणे, बार्देश, तिसवाडी, डिचोली व सत्तरी या तालुक्यात आघाडी मिळाली. डिचोली व सत्तरी या दोन्ही तालुक्यात एकूण ६९,२१४ मते मिळाली. बार्देशात १८,१७०, पेडण्यात १२,३५२ मते मिळाली आहेत. तिसवाडीत भाजपचे ४ आमदार असूनही २६१८ ची आघाडी मिळाली मात्र सांताक्रुझ व सांत आंद्रेत आघाडी मिळाली नाही. पणजी, ताळगाव व कुंभारजुवे मतदारसंघातही अपेक्षित मते मिळाली नाहीत.

BJP state president Sadanand Shet Tanawade said that voting was done on the basis of religion in the South Goa constituency
Goa Loksabha Election Result: उत्तरेत नाईकांचा विजयी षटकार; कॅप्टनकडून धेंपेंना ‘सायलेंट’ धक्‍का

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, की कळंगुट व सांताक्रुझ मतदारसंघात खूप कमी मते पडली. दक्षिणेतील ९ मतदारसंघात आमचा उमेदवार मागे राहिला. दक्षिणेत इंडी आघाडीचा उमेदवार जिंकल्याने काहींना केंद्रात तसेच राज्यात सरकार स्थापन करण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. मात्र, त्यांची ही स्वप्ने पूर्ण होणार नाहीत.

पुन्हा एकदा केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार येणार आहे. केंद्रातील व राज्यातील डबल इंजिन सरकार असल्याने गोव्यातील सरकार उर्वरित कार्यकाळ पूर्ण करील तसेच पुन्हा गोव्यात भाजप सरकार येईल.

जनतेचा कौल मान्य: मुख्यमंत्री

देशात तसेच गोव्यात जनतेने जो कौल दिला आहे, तो मान्य आहे. दक्षिणेतील काही विशेष मतदारसंघातून अधिक मते मिळण्याची अपेक्षा होती, पण आमचा अपेक्षाभंग झाला. आम्ही जरी हरलो असलो, तरी आमच्या मतांमध्ये वाढ होऊन ती २ लाखांहून अधिक मिळाली आहेत. उत्तरेत भाजपचा विजय निर्विवाद होता व दक्षिणेतही जिंकू असा विश्‍वास होता. मात्र, काही मतांनी हरलो असलो, तरी संघटनात्मक काम मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात सुरूच राहणार आहे. उत्तर गोव्यात ५६ टक्के मतदान मिळून पूर्ण बहुमत मिळाले आहे. उत्तरेत १६ मतदारसंघामध्ये, तर दक्षिणेत ११ मतदारसंघात मतांची आघाडी भाजपच्या उमेदवारांना मिळाली आहे.

BJP state president Sadanand Shet Tanawade said that voting was done on the basis of religion in the South Goa constituency
Goa Loksabha Election 2024 Result Update: गोव्यातील पहिल्या फेरीचे कल हाती; दक्षिणेत भाजपला झटका तर उत्तरेत दिलासा

विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

राजकारणात अनेक गोष्टी घडत असतात. मात्र, मुख्यमंत्री डॉ. सावंत व प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर गोव्यातून विक्रमी मताने भाजपचा उमेदवाराला निवडून देण्यात आले. दक्षिणेत जरी निकाल आमच्या बाजूने लागला नसला, तरी त्यात दुरुस्ती करण्यास वेळ लागणार नाही. सत्तरीच्या लोकांच्या सहकार्यामुळेच भाजप उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मते देणे शक्य झाले. हा सत्तरी लोकांचा विजय आहे.

श्रीपाद नाईक, केंद्रीय राज्यमंत्री तथा उत्तरेचे नवनिर्वाचित खासदार

उत्तरेतील मतदारांनी विक्रमी मतांनी निवडून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. गेल्या निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा यावेळी सुमारे ८ हजार मते अधिक मिळाली. त्यामुळे मतदारांनी विक्रम घडविला. उत्तरेमध्ये विकास करताना दक्षिणेत काँग्रेसचा खासदार असला तरी विकासकामे करताना दुजाभाव केला जाणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com